शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

भावाच्या मृत्यूला डॉ. विश्वास झाडे जबाबदार, हंसराज अहीर यांचा आरोप; गुन्हा दाखल करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 11:35 IST

हंसराज अहीर यांच्या भावाचा उपचारादरम्यान मृत्यू; पोलिस अधीक्षकांकडे तक्रार

चंद्रपूर : माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचे भाऊ हितेंद्र अहीर यांचा डॉ. विश्वास झाडे यांच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपचारात झालेल्या हलगर्जीपणामुळे आपल्या भावाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत डॉ. झाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अहीर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. 

अहीर यांचे लहान भाऊ हितेंद्र अहीर यांना १२ जानेवारीला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना अतिशय गंभीर अवस्थेत उपचारासाठी डॉ. झाडे यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी महिना उलटल्यानंतर अहीर यांनी भावाच्या मृत्यूला डॉ. झाडे यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती आहे. 

पोलिसांनी जबाब नोंदवला

माजी राज्यमंत्र्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉ. झाडे यांचे रुग्णालयत गाठून त्यांची चौकशी केली. यानंतर पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. याबाबत खुलासा करताना डॉ. झाडे म्हणाले, "हितेंद्र अहीर यांना गंभीर अवस्थेत आणले होते. अवघ्या पाच मिनिटांत त्यांचा मृत्यू झाला. यात माझी चूक नाही. या तक्रारीवरून पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही.

काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली

डॉ. झाडे हे काँग्रेसचे नेते आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात बल्लारपूरमधून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता. यासोबतच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाबाहेर राहून त्यांनी काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांना मदत केली. दुसरीकडे अहीर यांनी केलेल्या या आरोपानंतर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिरchandrapur-acचंद्रपूर