शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्यासाठी अर्ध्या किमीची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 06:00 IST

कुडरारा येथे राईट वॉटर सोल्युशन (जलस्वराज २) अंतर्गत फ्लोराईड रिमुव्हल वॉटर फिल्टर तीन वर्षांपूर्वी बसविण्यात आले होते. त्यामध्ये बोअरचे जोडण्यात आलेले पाणी पिण्यास अयोग्य असल्यामुळे ते पाणी गावकऱ्यांकडून नाकारण्यात आले. या वॉटर फिल्टरला गावाबाहेरील विहिरीवरून पाणी पुरवठा करण्यात यावा, असे ग्रामपंचायतीकडून प्रशासनाला कळविण्यात आले होते.

ठळक मुद्देपरिस्थिती बिकट । प्रशासनाने लक्ष देण्याची ग्राम पंचायतची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कघोडपेठ : येथून जवळच असलेल्या कुडरारा येथे आजही पिण्याचे पाणी आणण्यासाठी गावातील महिलांना अर्धा कि.मी.ची पायपीट करावी लागत आहे. याचा नाहक त्रास विशेषकरून महिलांना होत आहे. गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी बांधून नळयोजना तयार करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत गोरजातर्फे करण्यात आली आहे.भद्रावती तालुक्यातील ग्रा. पं. गोरजा अंतर्गत येत असलेल्या कुडरारा (कोंढाळी) येथे पिण्याचे पाणी आणण्यासाठी महिलांना रेल्वे लाईन ओलांडून अर्धा कि. मी. अंतरावर असलेल्या विहिरीवर जावे लागते.कुडरारा येथे अजूनपर्यंत पिण्याच्या पाण्याची टाकी व नळयोजना अस्तित्वात नाही. गावकऱ्यांच्या त्रासाचे कायमस्वरूपी नियोजन करण्यासाठी ग्रामपंचायत गोरजातर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना पिण्याच्या पाण्याची टाकी बांधून नळयोजना देण्याकरिता निवेदन देण्यात आले आहे. याकडे आता जिल्हा परिषदेने लक्ष देण्याची मागणी आहे.फ्लोराईड रिमुव्हल वॉटर फिल्टर निरुपयोगीकुडरारा येथे राईट वॉटर सोल्युशन (जलस्वराज २) अंतर्गत फ्लोराईड रिमुव्हल वॉटर फिल्टर तीन वर्षांपूर्वी बसविण्यात आले होते. त्यामध्ये बोअरचे जोडण्यात आलेले पाणी पिण्यास अयोग्य असल्यामुळे ते पाणी गावकऱ्यांकडून नाकारण्यात आले. या वॉटर फिल्टरला गावाबाहेरील विहिरीवरून पाणी पुरवठा करण्यात यावा, असे ग्रामपंचायतीकडून प्रशासनाला कळविण्यात आले होते. मात्र यादृष्टीने सकारात्मक अशी कुठलीही कार्यवाही झाली नाही. या वॉटर फिल्टरचा कोणताही वापर गावकरी करीत नाहीत. त्यामुळे शासकीय आर्थिक नुकसान होवू नये, या हेतूने कुडरारा येथील फ्लोराईड रिमुव्हल वॉटर फिल्टर लवकरात लवकर काढून नेण्यात यावे, अशी मागणीही ग्रामपंचायत गोरजातर्फे जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

टॅग्स :Waterपाणी