गुरुजींनी स्वत:च्या मुलांना दाखल केले जि.प. शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:00 IST2020-07-24T05:00:00+5:302020-07-24T05:00:57+5:30

सहाय्यक शिक्षक गुलाब राठोड यांनी आपल्या मुलांना इंग्रजी शाळेतून काढून जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता तिसऱ्या वर्गात दाखल केले. पालकांशी सातत्याने संपर्क साधून शाळेचे मुख्याध्यापक गोविंद गुप्ता, तोहीद शेख, शाळेचे शिक्षक पालकांच्या भेट घेवून विद्यार्थी संख्या वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे. या शाळेत नव्याने २८ विद्यार्थी दाखल झाले. पालकांचेही सहकार्य मिळत आहे.

Guruji admitted his children to Z.P. At school | गुरुजींनी स्वत:च्या मुलांना दाखल केले जि.प. शाळेत

गुरुजींनी स्वत:च्या मुलांना दाखल केले जि.प. शाळेत

ठळक मुद्देमराठी शाळा वाचविण्यासाठी पुढाकार : कॉन्व्हेंट शाळेतून नाव काढून अन्य शिक्षकांपुढे ठेवला आदर्श

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचांदूर : पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंटकडे असतो. यामुळे मराठी माध्यमांच्या काही शाळा ओस पडताना दिसत आहेत. मराठी शाळेचे शिक्षक पटसंख्या वाढावी, यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र पालक या शाळांना फारसा प्रतिसाद देत नाही. अशा निराशाजनक परिस्थितीत नांदा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी स्वत:च्या मुलांना जि. प. शाळेत प्रवेश करून घेतला आहे.
नांदा येथील जिल्हा परिषद शाळेचे विषय शिक्षक संजय पंचभाई यांनी आपल्या मुलाला पहिल्या वर्गात दाखल केले. सहाय्यक शिक्षक गुलाब राठोड यांनी आपल्या मुलांना इंग्रजी शाळेतून काढून जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता तिसऱ्या वर्गात दाखल केले. पालकांशी सातत्याने संपर्क साधून शाळेचे मुख्याध्यापक गोविंद गुप्ता, तोहीद शेख, शाळेचे शिक्षक पालकांच्या भेट घेवून विद्यार्थी संख्या वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे. या शाळेत नव्याने २८ विद्यार्थी दाखल झाले. पालकांचेही सहकार्य मिळत आहे.

कोकेवाड्यात ‘शिक्षण आपल्या दारी’ उपक्रम
नागभीड : पेंढरी कोकेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेने ‘शिक्षण आपल्या दारी उपक्रम’ सुरू केला आहे. उपक्रमशील शिक्षक विनोद लांडगे यांच्या मार्गदर्शनात पालकांचे समुपदेशन केले जात आहे. मुख्याध्यापक राऊत, सहाय्यक शिक्षक मानकर, वाटगुरे, खोब्रागडे, फुलसे, कुराम यांच्या मदतीने शाळा बंद पण शिक्षण चालू हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यासाठी गावातील तरुण मंडळी सहकार्य करीत आहेत. याच उपक्रमातंर्गत गावातील सर्व दुकाने, कार्यालय, रस्त्याला लागून असलेल्या भिंती बोलक्या करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी स्थानिक व्यावसायिक, औषध विक्रेते, किराणा दुकानदार, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समितीच्या सदस्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षकांनी दिली.

स्मार्ट फोन नसणाºया विद्यार्थ्यांच्या गृहभेटी
कोरपना : शासनाचे ‘शाळा बंद शिक्षण सुरू’ या मोहिमेअंतर्गत शहरी भागात आॅनलाईन वर्ग व कॉन्व्हेंट सुरू आहेत. मात्र आदिवासी व ग्रामीण भागातील सर्वच पालकांकडे स्मार्ट फोन उपलब्ध नाहीत. त्यामुळे ज्यांच्याकडे आहेत, अशर पालक विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला. वर्ग १ ते ८ चे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गृहभेटी घेवून शिक्षण सुरू आहे. मुख्याध्यापक अशोक गोरे घनश्याम पाचभाई, मंगला उरकुडे, निलेश मडावी, छाया कोडमेलवार, रेखा झाडे, मंगला चटप, शाळा समितीचे अध्यक्ष विलास ठाकरे, रविंद्र लामगे आदींचे मार्गदर्शन लाभत आहे.
 

Web Title: Guruji admitted his children to Z.P. At school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.