मासिक पाळीसंदर्भात महिलांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:29 IST2021-03-17T04:29:12+5:302021-03-17T04:29:12+5:30

चंद्रपूर : पंचतेली समाज मंदिर येथे बाबुपेठ महिला बचतगटाच्या वतीने महिला दिनानिमित्त कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक समिती ...

Guidance for women regarding menstruation | मासिक पाळीसंदर्भात महिलांना मार्गदर्शन

मासिक पाळीसंदर्भात महिलांना मार्गदर्शन

चंद्रपूर : पंचतेली समाज मंदिर येथे बाबुपेठ महिला बचतगटाच्या वतीने महिला दिनानिमित्त कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष सुनीता पोहाणे, तर प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस कमिटीच्या प्रदेश उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, जि. प. शिक्षिका उषा बल्लावार आदी उपस्थित होते. यावेळी बचतगटासाठी कोरोना काळातही काम करणाऱ्या आशा वर्कर शशिकला दाभेकर, शालू टेकाम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बचतगटाच्या सहयोगिनी चंदा वैरागडे यांनी मुली व महिलांमध्ये मासिक पाळीसंदर्भात मार्गदर्शन केले. संचालन सरोज चांदेकर, प्रास्ताविक सुरेखा बुटले यांनी केले. यावेळी स्नेहल अंबागडे, शारदा आंबटकर, रेखा वैरागडे, तृप्ती राजूरकर, शुभांगी कंदलवार, रेखा चांदेकर, संगीता टवलारकर, नम्रता मोरे, रितिका पोहाणे, शीतल गिन्नलवार, कल्पना वरभे, संगीता चिडे, अपर्णा धकाते, उज्ज्वला कार्लेवार, शालिनी काळे, प्रियंका खनके, मीनाक्षी बारकीने, उषा तंगडपल्लीवर, रूपाली बुटले, प्रणिता हजारे, शिल्पा वारूलवार, रजनी मडावी, तुलसी लिपटे, मंजू तांडुरवार आदी उपस्थित होत्या.

Web Title: Guidance for women regarding menstruation