नैसर्गिक शेतीवर बल्लारपुरात मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:35 IST2021-01-08T05:35:36+5:302021-01-08T05:35:36+5:30
जंगलातील झाडांना कोणी खते अथवा पाणी घालत नाही. तरीही तेथील झाडांना भरपूर फळे येतात. कुठल्याही प्रकारचा रोग जंगलातील झाडांवर ...

नैसर्गिक शेतीवर बल्लारपुरात मार्गदर्शन
जंगलातील झाडांना कोणी खते अथवा पाणी घालत नाही. तरीही तेथील झाडांना भरपूर फळे येतात. कुठल्याही प्रकारचा रोग जंगलातील झाडांवर येत नाही. निसर्गातील पोषण शास्त्राच्या नियमानुसार ही संपूर्ण प्रक्रिया घडत असून जमीन ही स्वतः अन्नपूर्णा आहे. रासायनिक खते ही पिकांचे खाद्य नाही तर जमिनीत आणि जमिनीच्या वर असणारे मित्र सूक्ष्मजीव हे वातावरणातील पोषक तत्वे पिकांना उपलब्ध करून देतात आणि सूक्ष्म जीवांना पोषण देण्याचे कार्य देशी गायीचे शेण आणि गोमूत्र करीत असते. रासायनिकीकरणामुळे महाग होत चाललेली शेती, खर्चापेक्षा उत्पन्न कमी, निसर्गाचा लहरीपणा अशा परिस्थितीमध्येही गो आधारित कृषी सर्व शेतकऱ्यांसाठी कशी फायदेशीर आहे, हे गादेवार यांनी उपस्थितांना पटवून दिले.
रासायनिक शेतीला टप्प्याटप्प्याने सोडून देऊन गो आधारित शेतीकडे वळल्याने रासायनिक शेतीपेक्षाही अधिक उत्पादन मिळत असल्याचे अनुभव काही शेतकऱ्यांनी याप्रसंगी सांगितले.
देशी गाईचे गोमूत्र, शेण, तूप, दूध, दही यांच्या सेवनाने मेंदूचे विकार,लकवा, दमा, अस्थमा, क्षय, रक्तदाब, मधुमेह, थायराॅइड, त्वचाविकार, हृदयविकार, पोटाचे आजार,मूत्रविकार, कॅन्सर, मुलांचे व स्त्रियांचे विविध आजार यासारख्या विविध रोगांवर कशाप्रकारे नियंत्रण मिळविता येऊ शकते, यासंबंधीचे मार्गदर्शन विनोद मदनकर यांनी केले.