कढोली येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:33 IST2018-10-21T00:30:35+5:302018-10-21T00:33:49+5:30
अंबुजा सिमेंट फाऊंडेशन उपरवाहीच्या वतीने कढोली येथे कापूस पिकाबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात आले.

कढोली येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : अंबुजा सिमेंट फाऊंडेशन उपरवाहीच्या वतीने कढोली येथे कापूस पिकाबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शक म्हणून व्यवस्थापक सोपान नागरगोजे, अध्यक्षस्थानी सरपंच रासिका पडवेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून अंबुजा सिमेंट फाउंंडेशनचे उत्पादक व्यवस्थाक विशाल भोगावार, कृषी सहाय्यक बावणे, प्रभाकर बोकडे, प्रकल्प क्षेत्र अधिकारी गोपाल, जंबुलवार, रूपेश गेडेकर, महेश झाडे, हरीचंद्र बोढे, साईनाथ पिंपळशेंडे, प्रदीप बोबडे, अश्विनी जेनेकर उपस्थित होते.
परिसरातील कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात विविध रोगांचे अतिक्रमण होत असल्याने उत्पादनात घट होत आहे. यासाठी अंबुजा फाउंडेशनतर्फे शेतकºयांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले. कपाशीची आधुनिक शेती कशी करावी, विविध किडींचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या, यासंदर्भात तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी कढोली (बु.) चार्ली, निर्ली, मानोली, बाबापूर, धिडशी, पेल्लोरा, मारडा येथील २०० पेक्षा अधिक शेतकरी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. तालुक्यातील कढोली (बु.) येथे अंबुजा सिमेंट फाऊंडेशन प्रक्षेत्र दिनानिमित्त पार पडलेल्या कार्यक्रमात कापूस, सोयाबिन व अन्य कडधान्य पिकांच्या लागवडीबाबत माहिती देण्यात आली.