२६ जानेवारीपासून सावलीत पालकमंत्री चषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:28 AM2021-01-23T04:28:20+5:302021-01-23T04:28:20+5:30

महोत्सवाचे उद्घाटन मंगळवार, दि. २६ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडणार आहे. अध्यक्षस्थानी ...

Guardian Minister's Cup in the shade from January 26 | २६ जानेवारीपासून सावलीत पालकमंत्री चषक

२६ जानेवारीपासून सावलीत पालकमंत्री चषक

Next

महोत्सवाचे उद्घाटन मंगळवार, दि. २६ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडणार आहे. अध्यक्षस्थानी प्रदेश युवक कॉंग्रेसच्या सरचिटणीस शिवाणी वडेट्टीवार, तर प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस कमिटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, ॲड. राम मेश्राम, शांताई फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल नाडेमवार, साईराम शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रोहित बोम्मावार, शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय मुत्यलवार, माजी नगरसेवक संदीप पुण्यपकार, युवा नेते निखील सुरमवार, युवा नेते संकेत बल्लमवार आदी उपस्थित राहणार आहे. क्रिकेट स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ५५,५५५, द्वितीय ३३,३३३, तृतीय २२,२२२, महिला कबड्डी स्पर्धेचे प्रथम पारितोषिक २१,१११, द्वितीय १५,५५५, पुरुष कबड्डी स्पर्धेचे प्रथम १०,५५५, द्वितीय ७,५५५ रुपये तसेच प्रत्येक बक्षिसासाह शिल्ड देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अंतबोध बोरकर, प्रफुल्ल बोरकर यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रसिद्धीपत्रकातून कळविले आहे.

Web Title: Guardian Minister's Cup in the shade from January 26

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.