पालकमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:30 AM2021-07-30T04:30:40+5:302021-07-30T04:30:40+5:30

शेतकऱ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात कापूस आणि सोयाबीनचे नुकसान झाले आहे. अंदाजे १० ...

The Guardian Minister inspected the damaged crops | पालकमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

पालकमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

Next

शेतकऱ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात कापूस आणि सोयाबीनचे नुकसान झाले आहे. अंदाजे १० हजार हेक्टरला नुकसानीचा फटका बसला असून, हा आकडा पुढे वाढूही शकतो. अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या जमिनी खरवडल्या. त्यामुळे मदतीची शेतकऱ्यांची मागणी आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून, पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पंचनाम्याचा अहवाल प्राप्त होताच शासन मदत जाहीर करेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, वाशिम व इतर ठिकाणी सोयाबीन आणि कापसाचे नुकसान झाले असून, पंचनामे झाल्यानंतर जे देय आहे, अशी मदत शेतकऱ्यांना देण्यात येईल.

यावेळी हडस्ती येथील शेतकरी शेंडे यांनी पालकमंत्र्यांना माहिती देताना सांगितले की, वर्धा नदीच्या पुलावरून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. समोरच इरईचा संगम असल्याने वर्धा नदी फुगली की बॅकवॉटर शेतात येते. यावेळी पालकमंत्र्यांनी इतरही शेतकऱ्यांशी संवाद साधला.

पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, बल्लारपूरचे तहसीलदार संजय राइंचवार, प्रकाश देवतळे यांच्यासह गावपातळीवरील कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: The Guardian Minister inspected the damaged crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.