तोहोगावच्या विकासासाठी पालकमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:31 IST2021-09-22T04:31:16+5:302021-09-22T04:31:16+5:30

तोहोगाव : गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव ग्रामपंचायतींतर्गत विविध विकासकामे करून घेण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी केलेला असून, विकासाची कामे मंजूर करण्यासाठी जिल्ह्याचे ...

To the Guardian Minister for the development of Tohogaon | तोहोगावच्या विकासासाठी पालकमंत्र्यांना साकडे

तोहोगावच्या विकासासाठी पालकमंत्र्यांना साकडे

तोहोगाव : गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव ग्रामपंचायतींतर्गत विविध विकासकामे करून घेण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी केलेला असून, विकासाची कामे मंजूर करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार व जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले यांना प्रत्यक्ष भेटून साकडे घातले आहे.

तोहोगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असून, गावातील रस्ते बांधकाम, होतकरू युवकांना सुदृढ आरोग्यासाठी प्रेरक ठरावी, अशी व्यायाम शाळा, ओपन जीम आदी विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना देण्यात आले. यावेळी ना.वडेट्टीवार यांनी तोहोगावकरांच्या मागण्यांना प्रतिसाद देत, विकासकामे मंजूर करण्याचे आश्वासन दिले. तद्वतच जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले यांना निवेदन देऊन जिल्हा परिषद स्तरावर विकास कामे मंजूर करण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी ग्रामपंचायत सरपंच अमावस्या ताडे, उपसरपंच शुभांगी मोरे, सदस्य मदन खामनकर, अनिता नगरकर, आनंद रामटेके, बबन मोरे, क्रिष्णा मडावी, श्यामराव नारेलवार उपस्थित होते.

Web Title: To the Guardian Minister for the development of Tohogaon