शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

चन्याचा हमीभाव जाहीर ! नोंदणीचा मुहूर्त अद्याप प्रलंबित; नोंदणी रखडल्याने शेतकरी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 18:56 IST

Chandrapur : सोयाबीन पिकाने चालू हंगामात दगा दिला, कापसाचे बाजारभाव घसरले आणि आता चनाही अपेक्षित दर देत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : सोयाबीन पिकाने चालू हंगामात दगा दिला, कापसाचे बाजारभाव घसरले आणि आता चनाही अपेक्षित दर देत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. चना पीक हातात आले असतानाच बाजारात केवळ सुमारे ४ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे, तर शासनाने ५ हजार ८५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, हमीभाव खरेदीसाठी आवश्यक नोंदणीचा मुहूर्त अद्याप जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

दोन दिवसांपूर्वी अकाली पावसामुळे चना, गहू, तूर आणि मिरची पिकांचे नुकसान झाले. पावसाळी वातावरणामुळे अनेक शेतकऱ्यांनी घाईघाईने चना काढणी करून तो घरात साठवला आहे. परंतु चना दीर्घकाळ घरात ठेवल्यास त्याची प्रतवारी खालावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

यावर्षी सुमारे २२ हजार ४२८ हेक्टर क्षेत्रावर चनाची पेरणी करण्यात आली आहे. हमीभाव जाहीर झाला असला तरी नोंदणी प्रक्रिया सुरू न झाल्याने खरेदीला विलंब होत आहे. नोंदणीस अनेक दिवस लागतात आणि त्यानंतरच प्रत्यक्ष खरेदी सुरू होते. मागील वर्षी बारदाना तुटवड्यामुळे हमीभाव खरेदी केंद्रे वारंवार बंद ठेवावी लागल्याचा अनुभव असल्याने शेतकरी साशंक आहेत.

अवकाळीमुळे नुकसान

वरोरा तालुक्यातील काही गावांमध्ये अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे केली जात आहे.

"चना पीक निघाले असून बाजारभाव कमी आहे. चना जास्त दिवस घरात ठेवल्यास त्याची प्रतवारी खराब होते. त्यामुळे हमीभाव नोंदणी तातडीने सुरू करावी."- राजेंद्र चिकटे, माजी सभापती तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, वरोरा

English
हिंदी सारांश
Web Title : Chickpea MSP Announced, Registration Delayed: Farmers Anxious About Losses

Web Summary : Chickpea farmers face losses due to low market prices. While MSP is announced, delayed registration worries farmers about crop quality deterioration and potential losses from unseasonal rains.
टॅग्स :farmingशेतीFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र