कामाच्या प्रतीक्षेत कामगारांचे जत्थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:24 IST2021-04-03T04:24:27+5:302021-04-03T04:24:27+5:30

चंद्रपूर : कोरोनामुळे अनेकांच्या हाताला काम नाही. कोणतेही छोटे-मोठे काम मिळेल, या आशेने शहरातील कामगारांचे जत्थेच श्री टॉकीज चौकात ...

Groups of workers waiting for work | कामाच्या प्रतीक्षेत कामगारांचे जत्थे

कामाच्या प्रतीक्षेत कामगारांचे जत्थे

चंद्रपूर : कोरोनामुळे अनेकांच्या हाताला काम नाही. कोणतेही छोटे-मोठे काम मिळेल, या आशेने शहरातील कामगारांचे जत्थेच श्री टॉकीज चौकात सकाळच्या सुमारास कोणताही कंत्राटदार येईल आणि काम देईल, या प्रतीक्षेत उभे असतात. मात्र कोरोनामुळे बहुतांश कामे बंद असल्याने या मजुरांना दररोज निराश होऊन परत जावे लागत आहे. चंद्रपूर शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. कोणतेही काम सहज उपलब्ध होते. या आशेन शहरात मोठ्या प्रमाणात कामगार तात्पुरत्या स्वरूपात स्थायिक झाले आहेत. शहरातील बंगाली कॅम्प परिसर व श्री टॉकीज चौकात कामगारांचे जत्थेच सकाळच्या सुमारास बघावयास मिळतात. एखादा कंत्राटदार या ठिकाणी येतो. आपल्याला आवश्यक असलेल्या कामगारांना काम देत असतो. मागील अनेक वर्षांपासून हा दिनक्रम सुरू आहे. मात्र मागील वर्षी कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे बाहुतांश कामावर परिणाम पडला. छोटे-मोठे व्यवसाय बंद झाले. अनेक जण बेरोजगार झाले. मध्यंतरी जीवनमान सुरळीत होत असतानाच पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे बहुतांश बांधकाम कामावर परिणाम पडला. शासकीय कामे बंदच आहेत. त्यामुळे छोटी-मोठी कामे करणाऱ्या कामगार व मजुरांना काम मिळेनासे झाले आहे. दररोज हे कामगार व मजूर सकाळी डब्बा घेऊन श्री टॉकीज चौक तसेच बंगाली कॅम्प परिसरात कामाच्या शोधात उभे असतात. मात्र कामच नसल्याने यांना दररोज परत जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.

बॉक्स

लॉकडाऊनची भीती सतावतेय

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नागपूरसारख्या शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमध्ये कामगार व मजुरांचे मोठे हाल झाले होते. आता पुन्हा जिल्हात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन तर होणार नाही ना, अशी भीती कामगारांना सतावत आहे.

- कोट

संपूर्ण कुटुंब मजुरीच्या भरवशावर आहे. मात्र कोरोनामुळे कधी काम मिळते. तर कधी आठवडाभर कामही मिळत नाही. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. कुटुंबाची गरजा भागवताना नाकीनऊ येत आहे. - गणेश वाढई, चंद्रपूर

Web Title: Groups of workers waiting for work