शालेयपयोगी उपक्रमासाठी गटसाधन केंद्राचे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:23 IST2021-01-15T04:23:12+5:302021-01-15T04:23:12+5:30
मारोडा येथील विश्वशांती विद्यालयात गटसाधन केंद्र मूल येथील विषय शिक्षकांनी भेट दिली. त्याचप्रमाणे यासाठी कोणत्या वर्गासाठी कोणते उपक्रम सुरू ...

शालेयपयोगी उपक्रमासाठी गटसाधन केंद्राचे मार्गदर्शन
मारोडा येथील विश्वशांती विद्यालयात गटसाधन केंद्र मूल येथील विषय शिक्षकांनी भेट दिली. त्याचप्रमाणे यासाठी कोणत्या वर्गासाठी कोणते उपक्रम सुरू आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अध्यापनासाठी त्याचा वापर कसा करता येईल, याची माहिती त्यांनी शिक्षकांना दिली. सध्या विद्यालयात नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग नियमित भरविले जात असून स्थानिक परिस्थितीनुसार इतर वर्ग सुरू करण्याचा विचार करता येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी गटसाधन केंद्राचे विषय शिक्षक संतोष सोनवणे, आनंद गोंगले, डांगे, सचिन पुल्लावार, शिक्षिका दुधानी, नीलिमा रेकलवार, झरकर उपस्थित होते. विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक संजय मुप्पावार, सुनील येनगंटीवार, गंगाधर कुनघाडकर यांनी चर्चेत सहभाग घेतला.