रक्तदानाने शिवाजी महाराजांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:25 IST2021-04-05T04:25:17+5:302021-04-05T04:25:17+5:30

३२ दात्यांनी केले रक्तदान चिमूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सरपंच ...

Greetings to Shivaji Maharaj for blood donation | रक्तदानाने शिवाजी महाराजांना अभिवादन

रक्तदानाने शिवाजी महाराजांना अभिवादन

३२ दात्यांनी केले रक्तदान

चिमूर

: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सरपंच प्रशांत कोल्हे यांनी वाहानगाव येथे रक्तदान शिबिर आयोजित केले. युवकांच्या वतीने रक्तदान करून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.

वाहानगाव ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने सरपंच प्रशांत कोल्हे यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायतच्या पटांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशासनाच्या आवाहनानुसार वाहानगाव येथे साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करून शिबिराला सुरुवात झाली. याप्रसंगी रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष तथा आरोग्य व शिक्षण सभापती रेखा कारेकार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सरपंच प्रशांत कोल्हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विविध सहकारी सोसायटीचे व्यवस्थापक आर. आर. कामडी, वाहानगावचे उपसरपंच उपस्थित होते. यावेळी परिसरातील ३२ रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान केले.

Web Title: Greetings to Shivaji Maharaj for blood donation