शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

धानोलीत साहाय्यकारी मतदान केंद्र मंजूर

By admin | Updated: October 11, 2014 23:06 IST

वरोरा विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या भद्रावती तालुक्यातील धानोली या गावामधील मतदारांच्या सोयीसाठी धानोली या साहाय्यकारी मतदान केंद्राला निवडणूक आयोगाने मंजुरी प्रदान केली.

चंद्रपूर : वरोरा विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या भद्रावती तालुक्यातील धानोली या गावामधील मतदारांच्या सोयीसाठी धानोली या साहाय्यकारी मतदान केंद्राला निवडणूक आयोगाने मंजुरी प्रदान केली. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी यासाठी आयोगाकडे सतत पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.१५ आॅक्टोबरला विधानसभा सार्वत्रिक निवडणुका होत आहे. निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्याच्या अनुषंगाने प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यावर आहे. मागील लोकसभा सार्वत्रिक निवडणुका २०१४ दरम्यान वरोरा विधानसभातंर्गत भद्रावती तालुक्यातील धानोली या गावामधील मतदान केंद्र सेलोटी वाघेडा या गावात स्थलांतरित करण्यात आले. यामुळे धानोली गावातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. धानोली येथे सर्वाधिक मतदार असल्याने आणि धानोली ते सेलोटी वाघेडा या गावामध्ये अंतर सात किलोमीटर इतके असल्याने धानोली गावामध्येच मतदान केंद्र असावे, या मागणीसाठी तेथील लोकांनी बहिष्कार टाकला होता. यामुळे धानोली गावातील नागरिक मतदानापासून वंचित राहिले होते. या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने धानोली येथील मतदान केंद्र नामंजूर केले होते. धानोली येथील नागरिकांची भावना लक्षात घेता निवडणूक विभागाने पुन्हा एकदा ५ आॅक्टोबरला मतदान केंद्राबाबत सुधारित प्रस्ताव मुख्य निवडणूक अधिकारी मुंबई यांच्या मार्फत निवडणूक आयोगाला पाठविला होता. हा प्रस्ताव मंजूर होण्याकरिता जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मुंबई येथील मुख्य निवडणूक अधिकारी आणि दिल्ली येथील निवडणूक आयोगामधील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जे.पी. लोढे यांनी देखील पाठपुरावा केला. याची दखल घेत निवडणूक आयोगाने धानोली हे साहाय्यकारी मतदान केंद्र मंजूर केले. जिल्हाधिकाऱ्यांचा पाठपुरावा व आयोगाच्या या निर्णयामुळे मतदारांना दिलासा मिळाला आहे. (शहर प्रतिनिधी)