ग्रामपंचायत उमेदवारांचा आकर्षक निवडणूक चिन्हांवर डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:29 IST2021-01-03T04:29:16+5:302021-01-03T04:29:16+5:30

अधिकाऱ्यांकडे निवडणूक नियमावली व अटींबाबत चर्चा करीत आहेत. उमेदवारांचा संभ्रम दूर व्हावा, यासाठी सर्व १५ तहसील कार्यालयाच्या दर्शनी भागावर ...

Gram Panchayat candidates keep an eye on attractive election symbols | ग्रामपंचायत उमेदवारांचा आकर्षक निवडणूक चिन्हांवर डोळा

ग्रामपंचायत उमेदवारांचा आकर्षक निवडणूक चिन्हांवर डोळा

अधिकाऱ्यांकडे निवडणूक नियमावली व अटींबाबत चर्चा करीत आहेत. उमेदवारांचा संभ्रम दूर व्हावा, यासाठी सर्व १५ तहसील कार्यालयाच्या दर्शनी भागावर निवडणूक चिन्हांची यादी लावण्यात आली. उमेदवार या चिन्हांची माहिती जाणून घेत आहेत. दैनंदिन वापरातील व आकर्षक चिन्ह मिळाल्यास विजयाचा मार्ग सुकर होईल, याचेही आडाखे बांधत आहेत.

प्रशासनाकडून जागृती

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणूक प्रशासनाकडून नागरिकांमध्ये जागृती केली जात आहे. ही निवडणूक कोरोनाच्या संकटात होत असल्याने प्रतिबंधात्मक खबरदारीही घेतली जात आहे.

कोट

ग्रा. पं. निवडणुकीतील उमेदवारांकडून पाच चिन्हांचा उल्लेख असलेला एक अर्ज भरून घेण्यात येणार आहे. त्यांच्या पसंतीक्रमानुसारच चिन्ह वाटप होईल. एकाच प्रभागामध्ये चिन्हांची पसंती सारखी असेल तर ज्या उमेदवाराचा अर्ज आधी आला त्यालाच निवडणूक चिन्ह निवडीबाबतचे प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.

-संपत खलाटे, उपजिल्हाधिकारी, निवडणूक चंद्रपूर

अशी आहेत चिन्ह

एअर कंडिशनर, सफरचंद, ऑटोरिक्षा, पांगूळ गाडा, मण्यांचा हार, पट्टा, बाकडे, सायकल पंप, दुर्बीण, बिस्कीट, होडी, पुस्तक, पेटी, ब्रेड टोस्टर, विटा, बादली, बस, गणकयंत्र, कॅन, ढोबळी मिरची, गालिचा, कॅरम बोर्ड, खटारा, फुलकोबी, सीसीटीव्ही कॅमेरा, साखळी, जाते, पोळपाट लाटणे, बुद्धिबळ, चिमणी, चिमटी, नारळाची बाग, रंगाचा ट्रे व ब्रश, संगणकाचा माऊस, संगणक, क्रेन, घन टोकळा, हिरा, डिश ॲन्टेना, दरवाजाची घंटी, दरवाजाची मूठ, ड्रील मशीन, डंबेल्स, कानातले दागिने, लिफाफा, एक्सटेन्शन, बोर्ड, बासरी, फुटबॉल, कारंजे, फ्राईंग पॅन, नरसाळे, ऊस, भेटवस्तू, आले, चष्मा, द्राक्षे, हिरची मिरची, हातगाडी, हेडफोन, हेलिकॉप्टर, हेल्मेट, हॉकी, वाळूचे घड्याळ, पाणी गरम करण्याचे हिटर, फणस, चावी, भेंडी, लॅपटॉप, कडी, लायटर, ल्युडो, जेवणाचा डबा, काडेपेटी, माईक, मिक्सर, नेल कटर, गळ्यातील टाय, भूईमुग, पेन, वाटाणे, पेन ड्राईव्ह, फोन चार्जर, उशी, अननस, प्लास्टर थापी, जेवणाची थाळी, घागर, पंचींग मशीन, रॅकेट, फ्रीज, रूम कूलर, रबरी शिक्का, सेप्टी पिन, शाळेची बाग, स्कूटर, बोट, शटर, सितार, दोरी, उडी, साबण, मोजे, सोफा, पाना, स्टॅप्लर, स्टेथास्कोप, स्टम्प, सूर्यफूल, झोका, स्वीच बोर्ड, इंजेक्शन, टीव्ही रिमोट, टॅक्सी, चहाची गाळणी, दूरध्वनी, भाला फेकणारा, नांगर, चिमटा, दाताचा ब्रश, दाताची पेस्ट, ट्रॅक्टर, बिगुल, तुतारी, टाईपरायटर, टायर्स, छत्री, व्हॅक्युम क्लिनर, वॉल हूक, पाकीट, अक्रोड, कलिंगड, पाण्याची टाकी, विहीर, पवनचक्की, खिडकी, सूप, लोकरीचा गुंडा व सुई आदी निवडणूक चिन्हांचा यंदाच्या यादीत समावेश आहे.

Web Title: Gram Panchayat candidates keep an eye on attractive election symbols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.