श्री शिवाजी महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:26 IST2021-03-21T04:26:19+5:302021-03-21T04:26:19+5:30

राजुरा : श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजुरा येथील सांस्कृतिक विभाग व आय.क्यु.ए.सी. विभाग यांच्या ...

Graduation Ceremony at Shri Shivaji College | श्री शिवाजी महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ

श्री शिवाजी महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ

राजुरा : श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजुरा येथील सांस्कृतिक विभाग व आय.क्यु.ए.सी. विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गोंडवाना विद्यापीठाच्या पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला माजी कुलगुरू डॉ.विजय आईंचवार मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ.आईंचवार यांच्या हस्ते पदवी वितरित करण्यात आली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम. वारकड होते. विशेष अतिथी म्हणून सुधाकरराव कुंदोजवार, माजी आमदार ॲड.संजय धोटे, ॲड.मुरलीधर धोटे, अविनाश जाधव, साजिद बियाबाणी, डॉ.राजेश खेराणी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात महाविद्यालयातील संशोधन केंद्रातून आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे, महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रा.संजय शेंडे यांना आचार्य पदवी मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला आणि महाविद्यालयातील एम.ए., एम.कॉम., एम.एससी., बी.ए., बी.कॉम. व बी.एससी. पदवी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी वितरित करण्यात आली. प्रास्ताविक डॉ.खेराणी यांनी केले. संचालन डॉ.संजय लाटेलवार यांनी केले.

Web Title: Graduation Ceremony at Shri Shivaji College