गोवरी झाले कोरोना हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:29 IST2021-04-20T04:29:30+5:302021-04-20T04:29:30+5:30
सोमवारी गावात १५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश नगराळे यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय अधिकारी डॉ. विपिनकुमार ...

गोवरी झाले कोरोना हॉटस्पॉट
सोमवारी गावात १५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश नगराळे यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय अधिकारी डॉ. विपिनकुमार ओदेला, आरोग्य कर्मचारी सुरेश कुंभारे, गाडगे, ढोके आशा वर्कर गावातील प्रत्येक कुटुंबांचे सर्वेक्षण करत आहेत. ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने दवंडी देऊन आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे तसेच सरपंच आशा उरकुडे, उपसरपंच उमेश मिलमिले, ग्रामविकास अधिकारी संजय तुरारे, शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे हेसुद्धा जनजागृती करत आहेत. गोवरी, रामपूर, साखरी, चुनाळा, सास्ती, बामनवाडा ही गावे हॉटस्पॉट ठरत आहेत. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी राजुरा तालुक्यातील ग्रामीण भागातील आर्वी, पाचगाव, विहिरगाव, भुरकुंडा, चनाखा या पाच केंद्रांना मान्यता देण्यात आली.
कोट
गोवरी येथे ॲन्टिजेन तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये १८ वर्षांखालील तरुण व सहावर्षीय बालकाचाही समावेश आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्यावी, सौम्य लक्षणे आढळल्यास तत्काळ आरोग्य विभागाला संपर्क साधून कोविड चाचणी करावी व वैद्यकीय उपचार घ्यावे.
_ डॉ. विपीनकुमार ओदेला, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, कढोली(बु)
-------