शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

सरकारने राष्ट्रसंताना भारतरत्न सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करुन राष्ट्रकार्याचा यथोचित सन्मान व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 18:48 IST

राष्ट्रसंत साहित्याचा  महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात समावेश व्हावा. 

चंद्रपूर: आज गावागावात सामुदायिक जीवनाची दृष्टी  विकसित करण्याची गरज आहे. सक्षम ग्रामसभा, ग्रामस्वच्छता, तंटामुक्त गाव झाल्यास देशाचे चित्रच पालटेल.  हे कार्य श्री संत तुकडोजी महाराजांच्या विचाराने आयुष्यात बदल घडतात. गावात बदल घडून येतात. सर्व धर्माचा समन्वय हाच विश्व शांतीचा उपाय राष्ट्रसंतानी सांगितलेला आहे. ग्रामगीतेनुरूप सामुहिक जीवनाच्या जागृतीची लाट निर्माण झाली पाहिजेत , असे प्रतिपादन म.रा. पंचायतराज  तज्ज्ञ समिती सदस्य चंदू पाटील मारकवार यांनी समारोप प्रसंगी पेंढरीत केले. 

राष्ट्रसंत  साहित्य विचारकृती संमेलनाचा समारोप रविवारी दुपारी झाला. अध्यक्षस्थानी चंदू मारकवार होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत कोकोडे ,ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, ज्येष्ठ श्रीगुरूदेव उपासक  गुलाब चौधरी , मुख्याद्यापक  सुभाष शिंदे , मधुसूदन दोनोडे , जि.प.सदस्य रमाकांत लोधे , ॲड. राजेंद्र जेनेकर , दिवाकर चाचरकर ,अरविंद किरीमकर , डॉ. विठ्ठल चौथाले ,पुणे येथील पंढरीनाथ चंदनखेडे , प्रदीप अडकीने ,घनश्याम चौके , सुर्यभान चौके आदी उपस्थित होते . 

समारोपिय कार्यक्रमात ॲड.भुपेश पाटील नागपूर , सुरेश डांगे चिमूर , विनायक बावणे वर्धा, संजय वैद्य वरोरा , सौ.मिरा मुळे अड्याळटेकडी , नंदू पिंपळकर चंद्रपूर , अमरनाथ जिवतोडे राजुरा , शशीकला सोनुले ,चंद्रकला पराते , पार्वता गुरनुले ,भास्कर वाढई, विलास चौधरी  ,बाळकृष्ण कवाडकर   आदींना संमेलन समितीच्या वतीने  विविध सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

संमेलन समितीच्या वतीने मांडलेले चार ठराव टाळ्या वाजवून सर्वानुमते पारित करण्यात आले.

१. भारत सरकारने राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज मरणोत्तर यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करावे. 

२. शेतकऱ्यांना कर्जमाफी करणाऱ्या महाराष्ट्र शासनाचे  अभिनंदन करणारा ठराव घेण्यात आला.  

३. सिंदेवाही ते चिमूर ही बससेवा रात्री दहावाजेपर्यंत सुरू व्हावी .

४. राष्ट्रसंत साहित्याचा  महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात समावेश व्हावा. 

या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. कोकोडे म्हणाले , राष्ट्रसंताचे साहित्य हे पवित्र साहित्य असून जनसामान्यांना प्रतिष्ठा देणारे अमोघ वाड्-मय आहे.त्यामुळे ग्रामगीतेचे वाचन चिंतन  गावाच्या पारावर झाले पाहिजे .त्यानुसारच आता भागवत, कीर्तन झाले पाहिजे. ग्रामगीतेनुरूप कृती झाल्यास देशाची परिस्थिती पालटू शकेल असे ते म्हणाले. सकाळच्या सत्रात अनुभवकथन कार्यक्रम श्रीकांत धोटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमात  सतिश लोंढे, पंढरी चंदनखेडे , महादेव हुलके, हरी बोढे, विजय चिताडे , आशा बुरडकर, वृंदा हुलके, विलास उगे, खूशाल गोहोकार आदींनी आपले ग्रामगीतेनुरूप अनुभव कथन सादर केलेत तर महिला संघटनेची गरज या विषयावरील  परिसंवाद प्रा.डॉ. माधुरी कोकोडे यांच्या अध्यक्षतेखाली झाला .यात ॲड. सारिका जेनेकर , जयश्री माथने , रोहिणी मंगरूळकर ,  मिरा मुळे यांनी भाग घेतला. सूत्रसंचालन रीता वैद्य यांनी केले तर आभार सुवर्णा कावळे  मानले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtraमहाराष्ट्र