शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाची शंभर एकर जमीन पडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:58 IST

सावली तालुक्यातील कृषी विभागाच्या अखत्यारित असलेली सुमारे शंभर एकर जमीन प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे पडित आहे.

ठळक मुद्देलाखोंचे उत्पन्न बुडाले : कोट्यवधीची संपत्ती धूळखात

उदय गडकरी ।लोकमत न्यूज नेटवर्कसावली : सावली तालुक्यातील कृषी विभागाच्या अखत्यारित असलेली सुमारे शंभर एकर जमीन प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे पडित आहे. या शेतातील धान उत्पादनातून मिळणारे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासोबतच कोट्यवधीची संसाधने धूळ खात असल्याचेही पहावयास मिळत आहे.या तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून तालुका बीजगुणक प्रक्षेत्र बोथली नावाने शंभर एकर शेती शासनाने हस्तांतरित करुन उत्पादन घेण्यायोग्य बनवली. लाखो रुपये खर्च करुन त्या शेतीची सुधारणा केली. मात्र मागील चार- पाच वर्षापासून या शेतीतून उत्पन्न घेण्यात कमालीची उदासीनता दिसून येत आहे. कृषी उपविभाग चंद्रपूर यांच्याकडे सदर शेतीचे व्यवस्थापन असून तेथील देखभाल व उत्पादन घेण्यासाठी मिश्रा नामक एका कृषी सहाय्यकाची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु या शेतीकडे कुणाचेही लक्ष नाही. एवढेच नव्हे तर या शंभर एकर शेती परिसरात असलेली कृषी विभागाची कोट्यवधीची वनसंपदाही वाºयावर सोडण्यात आली आहे.या शेतातून एकरी २० क्विंटल धानाचे उत्पादन जरी गृहित धरले आणि प्रति सरासरी दोन हजार रुपये भावाच्या हिशोबाने ४० लक्ष रुपयांचे उत्पन्न मिळत होते. खर्च वजा जाता किमान २० लक्ष रुपयांच्या शुद्ध नफ्यापासून शासन वंचित झाले आहे. याशिवाय कोट्यवधी रुपये खर्चून उपलब्ध करण्यात आलेली संसाधने धूळ खात पडलेली पहावयास मिळत आहेत.सावली नगरापासून दहा किमी अंतर असलेल्या तालुका वीज गुणक प्रक्षेत्र बोथली येथे सदर प्रतिनिधीने भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली असता उपलब्ध संसाधनाची दुरावस्था झाल्याचे निदर्शनास आले. या शेतातून उत्पन्न घेण्यासाठी दोन मोठ्या विहिरी, १.५ अश्वशक्तीचे आईल इंजीन, ३.५ अश्वशक्तीची विद्युत मोटार, एक जेट पंप, एक स्प्रिंकलर प्रिमीयम संच, ४६८ मीटरचे पीव्हीसी पाईप, याशिवाय धान्य साठविण्याकरिता तीन गोदाम, एक ट्रॅक्टर, आणि जीर्ण अवस्थेतील कार्यालयांचा समावेश आहे. अशा प्रकारची कोट्यवधी रुपयांची संपत्ती सध्या बेवारस आहे.या तालुका बीजगुणक प्रक्षेत्र केंद्रातून वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारित वाणांचे व प्रजातींचे संशोधन करण्यात यावे आणि शेतकºयांच्या उत्पादनात भर पडावी, हा प्रशासनाचा हेतू होता. मात्र कृषी उपविभागीय कार्यालय चंद्रपूरच्या उदासीनतेमुळे या शासनाच्या उदात्त हेतुलाच हरताळ फासण्याचे काम विद्यमान अधिकाºयांकडून, कर्मचाºयांकडून केले जात आहे. या परिसरात आंबा, चिक्कू, करवंद, आवळा, खिरव्या यासारख्या फळझाडांसोबतच साग वृक्षांचीही मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. ही वनसंपदासुद्धा लाखो रुपयांच्या घरात आहे. असेच दुर्लक्ष झाले तर ही वनसंपदासुद्धा नष्ट होण्यास वेळ लागणार नाही, अशी शक्यता वर्तविली जात आहे. या परिसरात असलेल्या शासनाच्या अनेक मौल्यवान मोटारींचीही चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. शेती योग्य असणारी जमीन गेल्या चार वर्षापासून पडित असल्यामुळे गुरांचे कुरण झाले आहे. परिसरातील अनेक शेतकरी आपल्या गुरांना चरण्यासाठी या शेतात आणत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. घनदाट जंगल परिसराच्या मध्यभागी असलेल्या संसाधनांची सुरक्षा करण्याकरिता एका वृध्दाची नेमणूक करण्यात आली, हे विशेष.