गोसेखुर्द नहराची पाळ फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 12:56 AM2019-08-15T00:56:14+5:302019-08-15T00:56:39+5:30

शेतातील पिकाला मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासनाने गोसेखुर्द प्रकल्पाची निर्मिती केली. या प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्याद्वारे शेतजमिनीला पाणी पुरवठा केला जातो. परंतु कंत्राटदाराने लाखापूरजवळील उजव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे बुधवारी कालव्याची पाळ फुटल्याने शंभर हेक्टरवरील धान पीक पाण्याखाली आले आहे.

The Gosekhurd canal has been paved | गोसेखुर्द नहराची पाळ फुटली

गोसेखुर्द नहराची पाळ फुटली

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांचे मोठे नुकसान : शंभर हेक्टर शेती पाण्याखाली

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : शेतातील पिकाला मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासनाने गोसेखुर्द प्रकल्पाची निर्मिती केली. या प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्याद्वारे शेतजमिनीला पाणी पुरवठा केला जातो. परंतु कंत्राटदाराने लाखापूरजवळील उजव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे बुधवारी कालव्याची पाळ फुटल्याने शंभर हेक्टरवरील धान पीक पाण्याखाली आले आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तहसीलदार विद्यासागर चव्हाण व नायब तहसीलदार निलेश खटके यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. परिस्थिती सुधारल्यानंतर पंचनामा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
ब्रह्मपुरी तालुक्यात सध्या धान रोवणी करण्याचे काम सुरु आहे. लाखापूर भागात रोवणीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र पाळ फुटल्याने पिकांच्या आशेवर जगणाºया शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नहर फूटण्याच्या घटना या विभागात निरंतर घडत आहे. काही दिवसांपूर्वी तोरगाव (खुर्द) येथील शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले होते. मात्र प्रशासनाने कोणतेही प्रतिबंधक उपाय योजना केल्या नाही. त्यानंतर पुन्हा बुधवारी लाखापूरशेजारील नहर फूटला. या पाण्यामुळे विनोद राऊत, जयपाल राऊत, अनमोल राऊत, स्मिता राऊत, बबन ढोरे, नरेश डोंगरवार, पांडुरंग राऊत, गुंजनराव राऊत, कौशल्य वलके, रवींद्र शेंडे आदी शेतकºयांचे नुकसान झाले आहे. नागरिकांनी नहराच्या निकृष्ट कामाविषयी वारंवार तक्रारी केल्या. मात्र प्रशासनाने याविषयी गंभीर दखल न घेतल्याने नहराची पाळ फूटून शेतजमीन पाण्याखाली आली. या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकारी व कंत्राटदारांवर कडक कारवाई करून नुकसान भरपाईची मागणी शेतकºयांनी प्रशासनाकडे केली आहे.

Web Title: The Gosekhurd canal has been paved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.