प्रदूषणमुक्त भारताचा संदेश देत त्यांनी सायकलने केला ४ हजार कि.मी.चा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:44 IST2021-02-23T04:44:05+5:302021-02-23T04:44:05+5:30

चंद्रपूर : चंद्रपूरचे नामदेव राऊत यांच्यासह रवींद्र तरारे, संदीप वैद्य, श्रीकांत उके, श्रीकांत रेड्डी, प्रसाद देशपांडे यांनी झाडे लावा, ...

Giving the message of pollution free India, he traveled 4,000 km by bicycle | प्रदूषणमुक्त भारताचा संदेश देत त्यांनी सायकलने केला ४ हजार कि.मी.चा प्रवास

प्रदूषणमुक्त भारताचा संदेश देत त्यांनी सायकलने केला ४ हजार कि.मी.चा प्रवास

चंद्रपूर : चंद्रपूरचे नामदेव राऊत यांच्यासह रवींद्र तरारे, संदीप वैद्य, श्रीकांत उके, श्रीकांत रेड्डी, प्रसाद देशपांडे यांनी झाडे लावा, झाडे जगवा, प्रदूषण मुक्त भारताचा संदेश देत सायकलने २६ दिवसांत ४ हजार किमोमीटरचा प्रवास केला आहे. या उपक्रमाबदल सोमवारी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत त्यांचा सत्कार केला. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक, कलाकार मल्लारप, घुग्घुसचे शहर संघटक विलास वनकर, हरमन जोसेफ, मुन्ना रोडे, अशोक खडके यांची उपस्थिती होती.

राऊत यांनी गुजरात येथील द्वारका येथून सायकल प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर द्वारका, जामनगर, चित्रोड, पाटण, राजस्थान, माउंट अबू, उदयपूर, अजमेर, जयपूर, दौसा, उत्तरप्रदेश, आग्रा, सौरिख, लखनऊ, अयोध्या, बस्ती, बिहार, गोपालगंज, फर्वेसगांज, पश्चिम बंगाल, सिलीगुडी, मालबाजर, अलीपुरदूर, आसाम, बारामा, रांगिया, बरसोला, तेजपुर, गोहपूर असा प्रवास करून ते अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे पोहोचले आहेत. या प्रवासादरम्यान त्यांनी प्रदूषनमुक्त भारतचा संदेश दिला. हा प्रवास पूर्ण करून ते चंद्रपुरात पोहचताच यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी नामदेव राऊत यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी या मोहिमेत सहभागी झालेल्या इतर सायकलस्वारांचीही उपस्थिती होती.

Web Title: Giving the message of pollution free India, he traveled 4,000 km by bicycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.