मेडिकल कॉलेजला संत जगनाडे महाराज यांचे नाव द्या

By Admin | Updated: August 14, 2015 01:23 IST2015-08-14T01:23:33+5:302015-08-14T01:23:33+5:30

चंद्रपूर येथील शासकीय महाविद्यालयाला तेली समाजाचे आराध्व दैवत संत जगनाडे महाराज यांचे नाव देण्याची मागणी तेली समाज व युवा एल्गार संघटनेच्या वतीने ...

Give the name of Saint Jagannade Maharaj to the medical college | मेडिकल कॉलेजला संत जगनाडे महाराज यांचे नाव द्या

मेडिकल कॉलेजला संत जगनाडे महाराज यांचे नाव द्या

मुख्यमंत्र्यांना निवेदन : तेली समाज व युवा एल्गार संघटनेची मागणी
चंद्रपूर : चंद्रपूर येथील शासकीय महाविद्यालयाला तेली समाजाचे आराध्व दैवत संत जगनाडे महाराज यांचे नाव देण्याची मागणी तेली समाज व युवा एल्गार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, चंद्रपूर जिल्हा तसेच महाराष्ट्र पातळीवर तेली समाज मोठ्या संख्येने आहे. परंतु शासन पातळीवर कोणत्याच योजना अथवा महत्त्वपूर्ण लोकोपयोगी संस्थेला जगनाडे महाराज यांचे नाव नाही. या पार्श्वभूमीवर चंद्रपुरातील वैद्यकीय महाविद्यालयात संत जगनाडे महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. संत जगनाडे महाराज हे संत तुकाराम महाराजाचे भक्त होते. संत जगनाडे महाराज यांची थोडक्यात माहिती अशी की तुकारामाच्या वैकूंठ गमनानंतर शाहिस्तेखानाने हल्ला केला. संताजी वह्यांची दौलत घेऊन सुदूंबरेला गेले. पुन्हा दिलेरखानचा हल्ला झाला. त्यावेळीसुद्धा अत्यंत कष्टाने संताजीने तुकोबाचा अभंय ओव्या लिहिलेल्या वह्यांचे जतन केले, तुकोबाच्या स्वहस्ते लिहिलेल्या वह्या, या झालेल्या हल्ल्यामध्येच, जाळपोळीत नष्ट झाल्या असाव्यात, असा बहुतेक जनतेचा समज होता. परंतु काही समाजकंटकांनी इंद्रायणी नदीच्या पात्रात तुकोबाचे अभंग, ओव्या लिहिलेल्या वह्या बुडविल्या. परंतु संताजीनी पुन्हा तुकोबांचे अभंग मुकपाट जसेच्या तसेच लिहून पुन्हा समाजामध्ये प्रचलित आणले. असे महान कार्य श्री संताजी जगनाडे महाराजांनी केले. त्याच्या कार्याची दखल घेऊन त्याचे नाव वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात यावे, अशी तेली समाज बांधवांची मागणी आहे.
सदर मागणीचे निवेदन रामदास तडस, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुडे, आमदार नाना श्यामकुळे यांना देण्यात आले. या शिष्टमंडळात तेलीक युवा एल्गार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र रघाताटे, उपाध्यक्ष जितू इटनकर, सचिव शैलेश जुमडे, कोषाध्यक्ष मनोज बेले यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Give the name of Saint Jagannade Maharaj to the medical college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.