शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक पिशव्यांच्या साठ्याची माहिती द्या, पाच हजार मिळवा!

By साईनाथ कुचनकार | Updated: July 3, 2024 15:14 IST

उत्पादक, साठेदार, पुरवठादार, विक्रेते ‘रडार’वर : महापालिका प्रशासनाचे निर्देश

चंद्रपूर : महानगरपालिका हद्दीत प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. आता प्लास्टिक उत्पादक, साठेदार, पुरवठादार, विक्रेते ‘रडार’वर आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश उपायुक्त मंगेश खवले यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले. यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, प्लास्टिक पिशव्यांच्या साठ्याबाबत माहिती देणाऱ्यास ५ हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे.

प्लास्टिक बंदीसाठी मनपामार्फत उपद्रव शोध पथक तयार करण्यात आले असून, पथकाद्वारे पालिका क्षेत्रातील सर्व दुकानदार, हॉकर्स, हातठेलेधारक, फेरीवाले, सर्व व्यावसायिक, वितरक, हार फुले विक्रेते यांच्याकडील प्लास्टिकचे आवरण असलेले बुके व खर्रा विक्री केंद्रांवरील पन्नी यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, प्लास्टिक पिशव्यांची माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असून, दिलेली माहिती खरी निघाल्यास ५ हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे.

बाजारात कोणत्याही छोट्या, मोठ्या वस्तू खरेदी केल्या की, आपसूकच दुकानदार प्लास्टिकची पिशवी देतो किंवा ती आवर्जून मागितली जाते. परिणामी मोठ्या प्रमाणात पर्यावरणाला हानी पोहोचत आहे. प्लास्टिक पिशवीला पर्याय म्हणून मनपामार्फत विकल्प थैला नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

बैठकीस सहायक आयुक्त नरेंद्र बोभाटे, सचिन माकोडे, संतोष गर्गेलवार, डॉ. अमोल शेळके, उपद्रव शोध पथक कर्मचारी उपस्थित होते.

शिक्षाही होणारएकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात १ जुलै २०२२ पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर ५ हजार रुपयांपर्यंत दंड, दुसऱ्यांदा वापर केल्यास १० हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५ हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीchandrapur-acचंद्रपूरpollutionप्रदूषण