मैत्रिणीवर अत्याचार; आरोपीला कारावास

By Admin | Updated: May 20, 2017 01:19 IST2017-05-20T01:19:26+5:302017-05-20T01:19:26+5:30

आपल्या मैत्रिणीवर प्रेमाच्या नावाखाली वारंवार अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने ७ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

Girlfriend tortured; Imprisonment of the accused | मैत्रिणीवर अत्याचार; आरोपीला कारावास

मैत्रिणीवर अत्याचार; आरोपीला कारावास

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आपल्या मैत्रिणीवर प्रेमाच्या नावाखाली वारंवार अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने ७ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. अमित गोपाल पोतदार (२८) रा. इंदिरानगर वॉर्ड हिंगणघाट जि. वर्धा असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पीडित मुलगी ही २०११ मध्ये चंद्रपूर येथील एका महाविद्यालयात बी.कॉम.चे शिक्षण घेत होती. याचदरम्यान आरोपी अमित पोतदार याची पीडितेसोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रित झाल्यानंतर आरोपी आणि पीडितेमध्ये नेहमीच बोलचाल होत होती. याच संधीचा फायदा घेऊन अमितने पीडितेला फिरायला जाण्याचा बहाणा सांगून एका लॉजमध्ये नेले. तिथे अमितने बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. यानंतर कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला.
दरम्यान, अमितकडून होणारा त्रास असह्य झाल्याने तिने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे आरोपी अमितवर ३७६, ५०६, सहकलम ६६ (अ) ६७ (अ) अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. रामनगरचे तत्कालीन ठाणेदार एम. डी. शरणागत यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
याप्रकरणात १७ मे रोजी निकाल देताना जिल्हा न्यायालयाने आरोपी अमित पोतदारला कलम ३७६ मध्ये ७ वर्ष कारावास व दहा हजार रूपये दंड, ५०६ मध्ये २ वर्ष कारावास व पाच हजार दंड, कलम ६६ (अ) ६७ (अ) मध्ये २ वर्ष कारावास व पाच हजार रूपये दंड व दंड न भरल्यास २ महिने कारावास अशी शिक्षा ठोठावली.
सदर प्रकरणाचा निकाल अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश नाइकवाडे यांनी दिला. तर अ‍ॅड. आसीफ शेख यांनी सरकारी पक्षातर्फे बाजू मांडली. तर कोर्ट पैरवी म्हणून राजू मेश्राम यांनी काम पाहिले.

Web Title: Girlfriend tortured; Imprisonment of the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.