वडिलासमोरच मुलगी विहिरीत पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:00 IST2020-06-13T05:00:00+5:302020-06-13T05:00:58+5:30

अडेगाव देश येथील रहिवासी असलेले संघपाल गजभिये यांचे पत्नीसोबत संशयावरून नेहमी वाद व्हायचे. शुक्रवारी सकाळीसुद्धा या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यात संघपाल सात महिन्यांची चिमुकली रुहानीला घेऊन निघून गेला. पत्नीही गावातील तंटामुक्त समितीकडे गेली. मात्र तंटामुक्त समितीचे कुणी मिळाले नाही. याच दरम्यान पती मुलीला घेऊन भास्कर बदके यांच्या शेतातील विहिरीत पडल्याचे एका नागरिकाने सांगितले.

The girl fell into the well in front of the father | वडिलासमोरच मुलगी विहिरीत पडली

वडिलासमोरच मुलगी विहिरीत पडली

ठळक मुद्देमुलीचा मृत्यू : मुलगी पडताच वडिलाचीही उडी

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अडेगाव (देश) येथील संघपाल केवड गजभिये याचे शुक्रवारी सकाळी पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाले. झालेल्या भांडणात संघपाल सात महिन्यांची मुलगी रूहानीला घेऊन गावाशेजारच्या शेतावर गेला. तहान लागली म्हणून विहिरीतून पाणी काढत असताना चिमुकली विहिरीत पडली. तिला वाचवण्यासाठी वडीलानेही उडी घेतली. यामध्ये मुलीचा दुर्दैवी अंत झाला. मात्र पिता बचावला. सदर घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजता घडली.
अडेगाव देश येथील रहिवासी असलेले संघपाल गजभिये यांचे पत्नीसोबत संशयावरून नेहमी वाद व्हायचे. शुक्रवारी सकाळीसुद्धा या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यात संघपाल सात महिन्यांची चिमुकली रुहानीला घेऊन निघून गेला. पत्नीही गावातील तंटामुक्त समितीकडे गेली. मात्र तंटामुक्त समितीचे कुणी मिळाले नाही. याच दरम्यान पती मुलीला घेऊन भास्कर बदके यांच्या शेतातील विहिरीत पडल्याचे एका नागरिकाने सांगितले. याची माहिती होताच गावकऱ्यांनीही विहिरीकडे धाव घेतली. मात्र चिमुकल्या रूहानीला वाचविता आले नाही. घटनेची माहिती चिमूर पोलीस विभागाला होताच घटनास्थळी पोहचून पोलिसांनी पंचनामा केला. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आला. रूहानीची आई सरिता हिच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून संघपाल गजभिये याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, संशय घेऊन संघपाल नेहमीच मारझोड व भांडण करायचा. त्यामुळे त्यानेच मुलीचा बळी घेतला असल्याचा आरोप पत्नी सारिताच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. पुढील तपास ठाणेदार स्वप्नील धुळे करीत आहेत.

Web Title: The girl fell into the well in front of the father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू