शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दिव्यांगांना भेटवस्तू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:36 IST2021-06-09T04:36:12+5:302021-06-09T04:36:12+5:30
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षातील ...

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दिव्यांगांना भेटवस्तू
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षातील पाच टक्के अपंग कल्याण निधीतून ग्रामपंचायत कमजटीने सर्व दिव्यांग बांधवांना खुर्ची भेट देण्याचे ठरविले होते. त्यानुसार शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून एकूण ८० बांधवांना खुर्ची भेट देण्यात आल्या. याप्रसंगी सरपंच देवेंद्र गेडाम, पंचायत समिती सदस्य श्यामसुंदर पुरकाम, उपसरपंच भगवान बन्सोड, ग्रा.पं सदस्य अनिल डोर्लीकर, सदस्य वासुदेव मस्के, सदस्य प्रदीप येसनसुरे, सदस्य रामेश्वर लंबेवार, ग्रा. पं. सदस्य मंगला बोरकर, मीनाक्षी कोमावार, रेशमा सडमाके, सरिता शेन्डे, शशिकला ठाकरे, प्रियंका गंजेवार उपस्थित होते.