भोजनसेवा देणाऱ्या सामाजिक संस्थांना जोरगेवारांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:01 IST2020-04-14T05:00:00+5:302020-04-14T05:01:03+5:30

दानी संस्थांना आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देत कठीणकाळी चंद्रपूरकरांना सेवा देत असल्याबदल त्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी या संस्थांच्या किचनला भेट देत त्यांच्या नियोजनाचीही माहिती जाणून घेतली. कोरोना विषाणू जागतिक संकट म्हणून समोर येत आहे. संपूर्ण जग या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

Gift of gifts to social organizations providing food service | भोजनसेवा देणाऱ्या सामाजिक संस्थांना जोरगेवारांची भेट

भोजनसेवा देणाऱ्या सामाजिक संस्थांना जोरगेवारांची भेट

ठळक मुद्देकिचनची पाहणी : नियोजनाबाबत दिल्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लॉकडाऊनमूळे अडचणीत आलेल्या गरजुंच्या मदतीसाठी अनेक सेवाभावी संस्था समोर आल्या असून त्यांच्या वतीने गरजुंसाठी भोजनाची व्यवस्था केल्या जात आहे. अशा दानी संस्थांना आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देत कठीणकाळी चंद्रपूरकरांना सेवा देत असल्याबदल त्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी या संस्थांच्या किचनला भेट देत त्यांच्या नियोजनाचीही माहिती जाणून घेतली.
कोरोना विषाणू जागतिक संकट म्हणून समोर येत आहे. संपूर्ण जग या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. भारतातही लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे. अशा गरजुंना आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून भोजनसेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र वाढती गरज लक्षात घेता सामाजिक संस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यानंतर आता शहरातील अनेक सेवाभावी संस्था गरजुंच्या मदतीला समोर येत गरजुंना भोजन वितरित करीत आहेत. अशा समाजिक संस्थांना त्यांनी भेट दिली. यावेळी आमदार जोरगेवार यांनी या संस्थांच्या नियोजनाचीही संपूर्ण माहिती जाणून घेतली. तसेच त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

Web Title: Gift of gifts to social organizations providing food service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.