घुग्घुस नगर परिषद घुग्घुसवासीयांच्या आंदोलनाचे फलित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:24 IST2021-01-02T04:24:51+5:302021-01-02T04:24:51+5:30
घुग्घुसला नगर परिषदेची मागणी होत असताना ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यामुळे घुग्घुसवासीयांनी २३ डिसेंबर रोजी घुग्घुस ग्रामपंचायतीच्या पटांगणात ...

घुग्घुस नगर परिषद घुग्घुसवासीयांच्या आंदोलनाचे फलित
घुग्घुसला नगर परिषदेची मागणी होत असताना ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यामुळे घुग्घुसवासीयांनी २३ डिसेंबर रोजी घुग्घुस ग्रामपंचायतीच्या पटांगणात बैठक घेऊन सर्वपक्षीय नगर परिषद स्थापना समिती गठित करण्यात आली. त्यानंतर २३ डिसेंबरपासून विविध प्रकारचे आंदोलन करुन सरकारचे लक्ष वेधण्यात आले. त्याचेच फलित म्हणून गुरुवारी नगर परिषदेची अधिसूचना जाहीर करण्यात आली. मात्र आता काही राजकीय पुढारी श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र घुग्घुस नगर परिषदेला दर्जा मिळवून देण्यास कुण्या एकट्याचे श्रेय नसून घुग्घुसवासीय व सर्वपक्षीय नगर परिषद स्थापना समितीचे श्रेय असल्याची माहिती सर्वपक्षीय नगर परिषद स्थापना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जि. प. माजी अध्यक्ष देवराव भोंगळे, जि. प. सभापती नितू चौधरी, प. स. सदस्य निरीक्षण तांड्रा, इबादुल सिद्दीकी, बंटी घोरपडे, रोशन पचारे यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
बॉक्स
सर्व पक्षीय संघर्ष समिती स्थापन झाली तेव्हा नगर परिषद झाल्यानंतर कुण्याही राजकीय पक्षाने याचे श्रेय घेऊ नये असे ठरले होते. मात्र घुग्घुसमध्ये कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी आपल्या कार्यालयासमोर फटाके फोडले. त्यामुळे इतर पक्षीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.