दरवाढीमुळे सामान्य जनता त्रस्त : सुभाष धोटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 23:30 IST2017-09-20T23:30:04+5:302017-09-20T23:30:16+5:30
भाजपा सरकारने तीन वर्षाच्या कार्यकाळात अनेक वस्तूंची भरमसाठ दरवाढ केली आहे. ३५० रुपयांचा सिलिंडर ७५० रुपयांवर पोहोचला असून तीन वर्षांत आठ हजारांच्यावर शेतकºयाच्या आत्महत्या केल्या.

दरवाढीमुळे सामान्य जनता त्रस्त : सुभाष धोटे
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : भाजपा सरकारने तीन वर्षाच्या कार्यकाळात अनेक वस्तूंची भरमसाठ दरवाढ केली आहे. ३५० रुपयांचा सिलिंडर ७५० रुपयांवर पोहोचला असून तीन वर्षांत आठ हजारांच्यावर शेतकºयाच्या आत्महत्या केल्या. यामुळे जनता त्रस्त असून भाजप सरकार भांडवलदारांचे असल्याचा आरोप माजी आ. सुभाष धोटे यांनी केला.
राजुरा येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या धरणे आंदोलनाला नगराध्यक्ष अरुण धोटे, पं. स. सभापती कुंदा जेनेकर, जि. प. सदस्य मेघा नलगे, बँकेचे संचालक दिलीप नलगे, नगरसेवक मजीद कुरेशी, अशोक राव, दादा लांडे, सागर लोहे, उपाध्यक्ष सुनील देशपांडे, पंचायत समिती सदस्य तुकाराम माणुसमारे, दिनकर कर्णेवार, एजाज अहमद, संतोष गठलेवार आदी उपस्थित होते.