खासगीकरणाविरोधात जनरल इन्शुरन्स कर्मचारी युनियन मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:27 IST2021-03-18T04:27:32+5:302021-03-18T04:27:32+5:30

चंद्रपूर : कंपनी खाजगीकरणच्या विरोधात देशातील सर्वच विमा क्षेत्रातील कर्मचारी युनियनने बुधवारी देशव्यापी आंदोलन ...

General Insurance Employees Union against privatization in the field | खासगीकरणाविरोधात जनरल इन्शुरन्स कर्मचारी युनियन मैदानात

खासगीकरणाविरोधात जनरल इन्शुरन्स कर्मचारी युनियन मैदानात

चंद्रपूर : कंपनी खाजगीकरणच्या विरोधात देशातील सर्वच विमा क्षेत्रातील कर्मचारी युनियनने बुधवारी देशव्यापी आंदोलन पुकारले. दरम्यान, येथील दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीतील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करून खासगीकरणाला कडाडून विरोध केला. खासगीकरण करून अन्याय केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

जनरल इन्शुरन्स कर्मचारी युनियन आणि असोसिएशनच्या संयुक्त फोरमद्वारा विविध मागण्यांसाठी चारही कंपन्यांनी एकत्रित येत विरोध दर्शविला. वेतन पुनर्निर्धारण, एनपीएसऐवजी सर्वांना १९९५६ ची पेन्शन योजना लागू करावी, पीएसजी आय कंपन्यांची खासगीकरण आणि विमा कंपनीमधे एफडीआईची सीमा ४९ टक्क्यांपासून ७४ टक्के वाढविल्याच्या निर्णयाचा विरोध दर्शविण्यासाठी आंदोलन पुकारण्यात आल्याची माहिती नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे वरिष्ठ शाखाधिकारी सोनल राऊत यांनी सांगितले. यावेळी सुनील घाटे यांनी युनियनच्या मागण्या विशद केल्या. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे वरिष्ठ सहायक संजीवनी कुबेर, नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे शाखा प्रबंधक सोनल राऊत, सुनील घाटे, वरिष्ठ सहायक सागर सोयाम, सहा. युनाइटेड इन्शुरन्स कंपनीच्या संध्या जोशी, संजय पझारे, श्रीकांत गजभिये आदींची यावेळी उपस्थिती होती.

Web Title: General Insurance Employees Union against privatization in the field