तरूणाईत कपड्यांच्या रंगाची गरबा-दांडियाची के्रझ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST2019-10-01T05:00:00+5:302019-10-01T05:00:57+5:30
नवरात्रौत्सवाची सर्वत्र धामधूम सुरू झाली आहे. मात्र पावसामुळे यामध्ये काही प्रमाणात विरजन पडले आहे. असे असले तरी तरुणाई त्याच जोशामध्ये नवरात्रोत्सव साजरा करीत आहेत. नवरात्रीचे उपवास, पूजा, कपड्यांचे नऊ रंग फॉलो करणे आणि गरबा - दांडिया खेळणे याकडे तरूणांचा ओढा कायम आहे.

तरूणाईत कपड्यांच्या रंगाची गरबा-दांडियाची के्रझ
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नवरात्रौत्सवाची सर्वत्र धामधूम सुरू झाली आहे. मात्र पावसामुळे यामध्ये काही प्रमाणात विरजन पडले आहे. असे असले तरी तरुणाई त्याच जोशामध्ये नवरात्रोत्सव साजरा करीत आहेत. नवरात्रीचे उपवास, पूजा, कपड्यांचे नऊ रंग फॉलो करणे आणि गरबा - दांडिया खेळणे याकडे तरूणांचा ओढा कायम आहे.
नवरात्रीचे नऊ दिवस हा शक्तिदेवीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून हा महोत्सव चालतो. हा नऊ रात्रींचा कालखंड म्हणून नवरात्रौत्सव म्हटला जातो. नवरात्रोत्सवात भक्ती भावनेने आणि पूर्ण श्रध्देने भक्तगण उपवार करतात. नवरात्रीत नऊ दिवसांचे नऊ रंग घालायची क्रेझ आहे. त्यामुळे बहुतांश तरुणाई त्या-त्या रंगाचे कपडे परिधान करीत असल्याचे सर्वत्र दिसत आहे.
या दिवसात तरुणाई अगदी उत्साहाने गरबा- दांडिया खेळतात. या नऊ दिवसांत अगदी धम्माल-मस्ती केली जाते. उत्सवाच्या निमित्ताने मित्रमंडळीसुद्दा एकत्र येत असल्यामुळे सर्वांच्या गाठीभेटीसुद्धा होतात. मनामध्ये योजलेले उद्दीष्ट प्राप्त व्हावेत, कुटुंबातील सर्व सदस्यांचे शारीरिक व मानसिक ताणतणाव दूर व्हावेत व आरोग्य सुलभ राहावेत. यासाठी काहीजण नऊ दिवस उपवास करतात. एवढेच नाही, तर काही जण या दिवसात चप्पलसुद्धा घालण्याचे टाळतात. वेशभुषा करून देवीसमोर दांडिया रास खेळल्या जाते. नवरात्री या सणाची अनेकजण आतुरतेने वाट पाहते.