शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणमुक्त संकल्पासाठी गणेश मंडळांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2016 00:55 IST

गणेश उत्सव दरम्यान जे मंडळ गणेश स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत या उत्सवाची मूळ परंपरा अबाधित राखून ध्वनीप्रदूषण मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याचा जाहीर संकल्प करतील, ...

पोलीस दलाचे आवाहन : जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून सत्कारचंद्रपूर : गणेश उत्सव दरम्यान जे मंडळ गणेश स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत या उत्सवाची मूळ परंपरा अबाधित राखून ध्वनीप्रदूषण मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याचा जाहीर संकल्प करतील, त्या मंडळाचे स्वत: पोलीस अधीक्षक संदीप दिवाण उत्सवादरम्यान भेट देऊन त्या मंडळाचा सत्कार करतील असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गणेश मंडळाकडून प्रतिसाद मिळत आहे.मंगलमय व भक्तिपूर्ण वातावरण निर्माण करुन सामाजिक ऐक्य अबाधित राखून आनंदोत्सव साजरा करण्याकरिता लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातील गणेश उत्सवाच्या मुळ परंपरेच महत्व विषद करुन ध्वनीप्रदूषण मुक्त गणेश उत्सव साजरा करण्यात यावा, याकरिता पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या संकल्पनेतून आवाहन करण्यात आले होते. त्याकरिता प्रत्येक गणेश मंडळाने स्वत:हून या मोहीमेत सहभागी व्हावे याकरिता या प्रोत्साहनपर सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेत शहरातील व जिल्ह्यातील अनेक गणेश मंडळ दिवसेंदिवस सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. ज्यामध्ये शहरातील लहाण-मोठे व प्रतिष्ठित मंडळांनी महत्वाचा पुढाकार घेतला आहे.या मोहिमेतंर्गत ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांनी ध्वनीप्रदूषण मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याचा संकल्प करणाऱ्या शहरातील मंडळांना भेटी देऊन त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. यामध्ये अर्थव गणेश मंडळ, आकाशवाणी रोड, चंद्रपूर तसेच चांदा औद्योगिक वसाहत महिला मंडळ चंद्रपूर या मंडळाचा समावेश होता.मंडळाच्या सत्काराच्या वेळी अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्यासह उपविभागीय पोलीस अधीकारी प्रल्हाद गिरी, रामनगरचे ठाणेदार संपत चव्हाण, सायबर सेल प्रभारी अधिकारी विकास मुंढे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. अर्थव गणेश मंडळ, आकाशवाणी रोड, चंद्रपूर तसेच चांदा औद्योगिक वसाहत महिला मंडळ, चंद्रपूर या व्यतिरिक्त ६ सप्टेंबर पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या हस्ते शहरातील गणेश मंडळाचा सत्कार करण्यात आला. या मोहिमेत सत्कार झालेल्या गणेश मंडळाचा इतरही गणेश मंडळांनी आदर्श घेऊन गणेश उत्सवाचा लोककल्याणकारी उद्दात हेतू साध्य होईल, ही अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून यात जिल्ह्यातील गणेश मंडळांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)