शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव (पोडे) येथे गांधीगिरीचे प्रदर्शन

By admin | Updated: February 6, 2016 01:05 IST

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत स्वच्छतेकडून समृध्दीकडे जाण्यासाठी मोहिम राबविण्यात येत आहे.

उघड्यावर जाणाऱ्यांना गुलाबपुष्प : गुडमार्निंग पथकाची कामगिरीबल्लारपूर : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत स्वच्छतेकडून समृध्दीकडे जाण्यासाठी मोहिम राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने नागरिकांना उघड्यावर शौचास जाताना संकोच वाटावा. त्यांना स्वच्छतागृहाची सवय लागावी. त्यांचे आरोग्यमान उंचावण्यास मदत व्हावी. याची जनजागृती केली जात आहे. यासाठी गुडमार्निंग पथकाची निर्मिती करण्यात आली. या पथकाच्या माध्यमातून बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) गावात मंगळवारी भल्या पहाटे गांधीगिरीचे अनोखे प्रदर्शन करण्यात आले. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना गुलाबपुष्प प्रदान करून सन्मान करण्यात आला.बल्लारपूर तालुका संपूर्ण हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करीत आहे. स्वच्छतेचा बल्लारपूर पॅटर्न साकारण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीस्तरावर नियोजित कार्यक्रमानुसार गावागावांत गुडमार्निंग पथकाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागृती केली जात आहे. स्वच्छतेची सवय लागण्यास हातभार लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे लोकांच्या मानसिकतेत बदल घडत आहे. गावागावांत स्वच्छतेची लोकचळवळ निर्माण होत आहे. स्वच्छता आरोग्याशी निगडीत असल्याचे महत्व लोकांना पटत आहे. तरीही काही लोक शौचालयाचा वापर न करता उघड्यावर शौचास जातात. परिणामी गावात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण होत आहे. याला प्रतिबंध लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे नांदगाव (पोडे) येथील सरपंच प्रमोद देठे, उपसरपंच मल्लेश कोडारी व माजी सरपंच गोविंदा पोडे यांनी सांगीतले.नांदगाव (पोडे) गाव संपूर्ण हागणदारीमुक्त करण्यासाठी व उघड्यावर शौचास जाणाऱ्यांच्या मनात संकोच निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील परिसर व सावित्रीबाई फुले आयटीआय परिसरात गुडमार्निंग पथकाने उघड्यावर शौचास जाणाऱ्यांचा गुलाबपुष्प प्रदान करून सन्मान केला. त्याच बरोबर त्यांच्याजवळील टमरेल जप्त करण्यात आले. ६० च्या आसपास नागरिकांचे गांधीगिरीने स्वागत करण्यात आले. या पथकात सरपंच प्रमोद देठे, उपसरपंच मल्लेश कोडारी, पं.स. उपसभापती अनेकश्वर मेश्राम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विश्वनाथ मुके, ग्रामपंचायत सदस्य रेखा मिटपल्लीवार, विनीता कोरवते, अनिता हस्ते, रोशन हस्ते, सुनिल शेंडे, प्रवीण खंडारे, राजू धारणे, मिनाक्षी उराडे, सुवणा४ जोशी, अंकुश उराडे, ग्रामविकास अधिकारी राकेश मांढरे यांचा समावेश होता. गुडमार्निंग पथकाची गावकऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. (शहर प्रतिनिधी)