आरोग्‍यसेवेसाठी गडकरी यांनी केलेले सहकार्य मोलाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:30 IST2021-05-20T04:30:05+5:302021-05-20T04:30:05+5:30

चंद्रपूर : कोरोनाविरुद्धच्या लढाईत व्‍हेंटिलटर, ऑक्‍सिजन, कॉन्सेंट्रटर आदी उपकरणांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डॉ. हेडगेवार ...

Gadkari's support for healthcare is invaluable | आरोग्‍यसेवेसाठी गडकरी यांनी केलेले सहकार्य मोलाचे

आरोग्‍यसेवेसाठी गडकरी यांनी केलेले सहकार्य मोलाचे

चंद्रपूर : कोरोनाविरुद्धच्या लढाईत व्‍हेंटिलटर, ऑक्‍सिजन, कॉन्सेंट्रटर आदी उपकरणांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डॉ. हेडगेवार जन्‍मशताब्‍दी सेवा समिती चंद्रपूर या सेवाभावी संस्‍थेला रुग्‍णवाहिका भेट दिली. जिल्‍ह्यातील दुर्गम भागातील आरोग्‍य सेवेला सहकार्य केले आहे. आम्‍ही या लोकनेत्‍याचे कायम आभारी राहू, असे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. आश्रय बालकाश्रमातील कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी डॉ. हेडगेवार जन्‍मशताब्‍दी सेवा समितीचे अध्‍यक्ष वसंत थोटे, सचिव आशिष धर्मपूरीवार, संदीप बच्‍चुवार, प्रांत धर्मजागरण प्रमुख महेंद्र रायचुरा, संघाचे जिल्‍हा कार्यवाही शैलेश पर्वते, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्‍थायी समितीचे सभापती रवी आसवानी उपस्थित होते. डॉ. हेडगेवार जन्‍मशताब्‍दी सेवा समिती चंद्रपूरच्‍या माध्‍यमातून १८ बेडेड कोविड केअर सेंटरला आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली व पाहणी केली.

Web Title: Gadkari's support for healthcare is invaluable