राजुरा विधानसभा क्षेत्रात विविध कामांसाठी निधी

By Admin | Updated: September 3, 2015 00:44 IST2015-09-03T00:44:54+5:302015-09-03T00:44:54+5:30

केंद्रात व राज्यात भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून विविध योजना व उपक्रम राबविल्या जात आहे.

Fund for various works in Rajura assembly segment | राजुरा विधानसभा क्षेत्रात विविध कामांसाठी निधी

राजुरा विधानसभा क्षेत्रात विविध कामांसाठी निधी

शासनाची मंजुरी : कामांना लवकरच प्रारंभ
चंद्रपूर: केंद्रात व राज्यात भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून विविध योजना व उपक्रम राबविल्या जात आहे. सत्ता स्थापनेनंतर अल्पावधीत राजुरा विधानसभा क्षेत्रात विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. यात राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालय इमारत बांधकाम, राजुरा, गडचांदूर व गोंडपिपरी येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह इमारत बांधकाम, राजुरा-बल्लारपूर मार्गावरील वर्धा नदीवरील पुलाची उंची वाढविणे, शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई रक्कम आदींचा यात समावेश आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्र हे मागासलेले आणि नक्षलग्रस्त आहे. जिवतीसारख्या अतिदुर्गम भागातील नागरिकांना ग्रामीण रुग्णालयाअभावी उपचारासाठी राजुरा, कोरपना, चंद्रपूर किंवा अन्य ठिकाणी जावे लागत होते. परंतु आ. संजय धोटे यांनी जिवती येथे ग्रामीण रुग्णालय मंजुरी व बांधकाम करण्याची मागणी शासनाकडे रेटून धरली होती. त्याचे फलीत म्हणून जुलै- २०१५ च्या अधिवेशनातील अर्थसंकल्पात या ग्रामीण रुग्णालयास मंजुरी देऊन निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांचे श्रेणीवर्धीत उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाला मंजुरी प्राप्त झालेली असून वर्ष लोटूनही निधी अप्राप्त होता. परंतु आ. संजय धोटे यांनी वेळोवेळी राज्याचे वित्त व आरोग्यमंत्री यांच्या भेटी घेऊन निधी उपलब्ध करुन देण्यास भाग पाडत जुलै- २०१५ च्या पुरवणी अर्थसंकल्पात निधी मिळविला असून लवकरच टेंडरिंग होऊन बांधकाम सुरू करण्यात येणार आहे.
राजुरा-बल्लारपूर मार्गावरील नदी पुलावर पावसाळ्यात अनेक अडचणीला प्रवास्यांना पुढे जावे लागत होते. या पुलाची उंची वाढविण्याची मागणी अनेकदा करण्यात होती. परंतु तत्कालीन लोकप्रतिनिधींकडून आश्वासनच देण्यात येत होते. मात्र आ. संजय धोटे यांनी जनतेच्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन वर्धा नदीवरील पुलाची उंची वाढविण्याकरिता केंद्र व राज्य मंत्रालयाला सतत पत्रव्यवहार करुन नदीवरील पुलाची उंची वाढविण्याकरिता ६९ कोटी रुपये मंजूर मिळाली आहे. १० कोटी रुपये प्राप्त झाले आहे. यासोबतच राजुरा, गडचांदूर येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह बांधकामाला मंजुरी प्रदान झाली आहे. राजुरा येथील वसतीगृहाच्या बांधकामाला तीन कोटी ५० लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे तर गोंडपिपरी येथील वसतिगृहाच्या उर्वरित बांधकामासाठी अप्राप्त असलेला निधी मंजूर करण्यात आलेला आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Fund for various works in Rajura assembly segment