शाळांच्या दुुरुस्तीसाठी ३० लाखांचा निधी
By Admin | Updated: September 3, 2014 23:15 IST2014-09-03T23:15:26+5:302014-09-03T23:15:26+5:30
दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी होत असल्याची ओरड आहे. ही ओरड कायम बंद व्हावी, जिल्हा परिषद शाळांना पूर्वीसारखे दिवस यावे यासाठी जिल्हा परिषद प्रशासन

शाळांच्या दुुरुस्तीसाठी ३० लाखांचा निधी
शिक्षण समितीची सभा : २४ शाळांना मिळणार संगणक
चंद्रपूर : दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी होत असल्याची ओरड आहे. ही ओरड कायम बंद व्हावी, जिल्हा परिषद शाळांना पूर्वीसारखे दिवस यावे यासाठी जिल्हा परिषद प्रशासन गुणवत्तावाढीसोबतच, प्रशस्त इमारत, दर्जेदार बैठक व्यवस्था करण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. यासाठी शाळांची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा परिषद मोठ्या प्रमाणात खर्च करीत आहे. जिल्ह्यातील ३४ शाळांच्या दुरुस्तीसाठी ३० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाची सभा बुधवारी जिल्हा परिषद सभागृहात पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव रामभाऊ टोंगे, ब्रिजभूषण पाझारे, चौखे आदी सदस्य उपस्थित होते. शिक्षण समिती अध्यक्ष तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप गड्डमवार अनुपस्थितीत होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद शाळा येरूर येथील अतिरिक्त शिक्षकाचा मुद्दा यावेळी गाजला. नकोडा येथील शिक्षकाची बदली करून येरूर येथे शिक्षण विभागाने अतिरिक्त शिक्षक दिला. त्यामुळे दुसऱ्या शिक्षकावर अतिरिक्त होण्याची वेळ आली. अशा अनेक शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक देण्यात आल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ब्रिजभूषण पाझारे यांनी लावून धरली. याप्रकरणी योग्य चौकशी करण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले. दरम्यान जिल्हा परिषदेच्या ३४ शाळांची दुरुस्तीसाठी मंजूरी देण्यात आली असून यासाठी ३० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. सोबतच २४ शाळांनी ५४ संगणक पुरविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला असून १० शाळांना निर्लेखित करण्यात येणार आहे. यावेळी शिक्षक दिनाचा कार्यक्रमासाठी एक लाख रुपयाचा निधीच्या खर्चाचा शिक्षण समितीने मंजूरी दिली.(नगर प्रतिनिधी)