रात्री १२ पर्यंत वाजविता येणार भोंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 05:00 IST2020-01-09T05:00:00+5:302020-01-09T05:00:17+5:30

केंद्र शासनाच्या १० ऑगस्ट २०१७ रोजीच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण सुधारित नियम, २०१७ च्या नियम ५ उपनियम (३) व त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिपणीनुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादीच्या वापराबाबत श्रोतागृहे, सभागृह, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्यात निकडीनुसार, वर्षांमध्ये १५ दिवस निश्चित करुन सकाळी ६ वाजल्यापासुन ते रात्री १२ वाजतापर्यत सुट जाहीर करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

The frown will be played until 12pm | रात्री १२ पर्यंत वाजविता येणार भोंगा

रात्री १२ पर्यंत वाजविता येणार भोंगा

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : सात उत्सवासाठी विशेष परवानगी, ध्वनिमर्यादा पाळावी लागणार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील प्रमुख सात उत्सवादरम्यान रात्री १२ वाजतापर्यंत लाऊडस्पिकर्स वाजवण्याची परवानगी जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी दिली आहे. या परवानगीमुळे उत्साह साजरा करणाऱ्यांमध्ये काही प्रमाणात का होईना आनंद व्यक्त केला जात आहे.
केंद्र शासनाच्या १० ऑगस्ट २०१७ रोजीच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण सुधारित नियम, २०१७ च्या नियम ५ उपनियम (३) व त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिपणीनुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादीच्या वापराबाबत श्रोतागृहे, सभागृह, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्यात निकडीनुसार, वर्षांमध्ये १५ दिवस निश्चित करुन सकाळी ६ वाजल्यापासुन ते रात्री १२ वाजतापर्यत सुट जाहीर करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून विविध सात उत्सवादरम्यान रात्री १२ वाजतापर्यंत लाऊडस्पिकर्स वाजविण्यासाठी अनुमती दिली आहे. असे असले तरीही उत्सवादरम्यान संबंधितांना परवानगी घ्यावीच लागणार आहे.

पाच दिवस अजूनही राखीव
२२ ऑगस्ट २०१७ च्या शासन निर्णयाअन्वये सन २०२० करीता १५ दिवस निश्चित करण्याकरिता, ध्वनी प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस अधिक्षकांसोबत ३१ डिसेंबर २०१९ ला चर्चा करण्यात आली. यामध्ये विविध १० दिवस निश्चित करण्यात आले असून उर्वरित ५ दिवस राखीव ठेवण्यात आले आहेत. या दिवसासंदर्भात पुन्हा नव्याने आदेश निघण्याची शक्यता आहे.
ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० च्या नियम ५ (३) नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर श्रोतेगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी सन २०२० करिता १० दिवसांसाठी, फक्त ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजतापर्यंत परवानगी देण्याचे आदेश देण्यात आले आहे.

घ्यावी लागणार परवानगी
सूट दिलेल्या दिवसाकरिता सक्षम प्राधिकारकडून परवानगी घेवूनच त्यांनी ठरवून दिलेल्या अटी व शर्ती प्रमाणेच ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर करता येईल, तसेच आवारावरही निर्बंध असेल, असे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सांगितले.

या उत्सवांचा राहणार समावेश
शिवजयंती, ईद-ए- मिलाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रत्येकी एक दिवस, गणेश उत्सव ३ दिवस (अनंत चर्तुदशी व २ दिवस), नवरात्री उत्सव २ दिवस (अष्टमी व नवमी), धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन १ दिवस व ३१ डिसेंबरसाठी १ दिवस. ध्वनीक्षेपकाची ध्वनीवर्धक वापरासाठी वेळेत सुट देण्याबाबत इतर ०५ दिवसांचे बाबतीत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गणेश उत्सवाकरिता असलेले उर्वरित २ दिवसांचे बाबतीत सुध्दा विशेष आदेश काढण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: The frown will be played until 12pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.