दामदुपटीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 05:00 IST2021-07-05T05:00:00+5:302021-07-05T05:00:37+5:30
मागील आठ महिन्यांपूर्वी वडगाव परिसरात धनलक्ष्मी फायनान्स कंपनी सुरू केली. ग्राहकांना दामदुपटीचे आमिष दाखविण्यात आले. त्यामुळे अनेकांनी येथे गुंतवणूक केली. परंतु, पैसे परत करण्यापूर्वीच ही कंपनी बंद केली. याबाबतची तक्रार ओमकार नगर येथील दिगांबर आत्राम यांच्यासह अन्य १५ जणांनी १३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार १६ डिसेंबर २०२० रोजी रामनगर पोलिसांकडे केली होती.

दामदुपटीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : फायनान्स कंपनीच्या नावाखाली दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून लाखों रुपयांची फसवणूक करणाऱ्या तसेच मागील सात महिन्यापासून फरार असलेल्या भद्रावती येथील प्रवीण सोळंखी याला रामनगर पोलिसांनी रविवारी अटक केली. तर समीर अन्सारी, भद्रावती व मुंबई येथील पांडे या फरार आरोपींचा शोध सुरू असल्याचे चंद्रपूर रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कमलेश जयस्वाल यांनी दिली.
मागील आठ महिन्यांपूर्वी वडगाव परिसरात धनलक्ष्मी फायनान्स कंपनी सुरू केली. ग्राहकांना दामदुपटीचे आमिष दाखविण्यात आले. त्यामुळे अनेकांनी येथे गुंतवणूक केली. परंतु, पैसे परत करण्यापूर्वीच ही कंपनी बंद केली. याबाबतची तक्रार ओमकार नगर येथील दिगांबर आत्राम यांच्यासह अन्य १५ जणांनी १३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार १६ डिसेंबर २०२० रोजी रामनगर पोलिसांकडे केली होती.
पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि ४२०, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. मागील आठ महिन्यांपासून पोलिस आरोपींच्या शोधात होते. परंतु, आरोपी पोलिसांना सापडत नव्हता. रविवारी रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार कमलेश जयस्वाल यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर भद्रावती येथून प्रवीण सोळंखी याला अटक केली.
फरार आरोपींच्या शोधात पथक गठित केली असून फरार आरोपींना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती ठाणेदार जयस्वाल यांनी दिली. विशेष म्हणजे, जिल्ह्यात यापूर्वीही अशाच अनेक घटना घडल्या आहे. मात्र नागरिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्याचे काळत आहे.