चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघातात चार जागीच ठार तर एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 10:10 AM2020-12-16T10:10:25+5:302020-12-16T10:11:45+5:30

Chandrapur News accident वाढदिवस साजरा करून परत येत असताना झालेल्या अपघातात 4 जण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्रौ 10.30 वाजताच्या दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात अजयपूरजवळ घडली.

Four people were killed on the spot and one was seriously injured in the accident | चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघातात चार जागीच ठार तर एक गंभीर जखमी

चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघातात चार जागीच ठार तर एक गंभीर जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वाढदिवस साजरा करून परत येत असताना झालेल्या अपघातात 4 जण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्रौ 10.30 वाजताच्या दरम्यान अजयपूर जवळ घडली. यात स्मीत पटेल (25), मोहम्मद अमन (23), दर्शना उधवाणी (25) आणि प्रगती निमगडे (24) हे जागीच ठार झाले तर योग गोगरी हा गंभीर जखमी आहे. 
    मूल येथील योग गोगरी यांचा मंगळवारी वाढदिवस होता, त्याने आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी एम एच 34 ए एम 9297 या चारचाकी वाहनाने चंद्रपूर मार्गावरील एका हाॅटेलमध्ये मध्ये मित्रासह गेला होता, वाढदिवस साजरा करून सर्व मित्र परत येत असतांना अजयपूर जवळील एका शेतातून अचाणक टॅªक्टर मुख्यमार्गावर आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि झालेल्या अपघातात स्मीत पटेल (25), मोहम्मद अमन (23), दर्शना उधवाणी (25) आणि प्रगती निमगडे (24) यांचा जागीच मृत्यु झाला तर योग गोगरी हा गंभीर जखमी आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहे. सदर मुलं हे मूल येथील प्रतिष्ठीत व्यापारी घरातील असून प्रगती निमगडे हिचे वडील शिक्षक आहेत. सदर घटनेमुळे मूल शहरात शोककळा पसरलेला आहे.

Web Title: Four people were killed on the spot and one was seriously injured in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात