चार वकिलांनी घेतली माघार, तीन मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:33 IST2021-09-17T04:33:43+5:302021-09-17T04:33:43+5:30

बल्लारपूर : चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनची २०२१-२०२३ ची निवडणूक २२ सप्टेंबरला होत असून, यंदाच्या निवडणुकीत वकिलांचा उत्साह दिसत आहे. ...

Four lawyers withdrew, three in the field | चार वकिलांनी घेतली माघार, तीन मैदानात

चार वकिलांनी घेतली माघार, तीन मैदानात

बल्लारपूर : चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनची २०२१-२०२३ ची निवडणूक २२ सप्टेंबरला होत असून, यंदाच्या निवडणुकीत वकिलांचा उत्साह दिसत आहे.

चंद्रपूर बार असोसिएशन चंद्रपूरच्या अध्यक्ष पदासाठी सात वकिलांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी चार उमेदवारांनी आपले अर्ज गुरुवारी मागे घेतल्यामुळे आता तीन उमेदवार मैदानात आहेत. कार्यकारिणीच्या १२ सदस्य पदासाठी ३० वकिलांनी अर्ज भरले होते. त्यापैकी ५ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. २५ उमेदवार मैदानात आहे, तर उपाध्यक्ष पदासाठी तीन उमेदवारांनी अर्ज केला. त्यापैकी एकाने मागे घेतला. आता दोन उमेदवार रिंगणात आहेत. सचिव पदासाठी सहा उमेदवारांनी अर्ज केला. त्यापैकी चार जणांनी मागे घेतला. आता दोन उमेदवार आहे. सहसचिव पदासाठी दोन उमेदवार उभे आहेत, तर कोषाध्यक्ष पदासाठी चारजणांनी अर्ज केला. त्यापैकी एकाने मागे घेतला. तीन उमेदवार उभे आहे व ग्रंथपालसाठी दोन उमेदवार उभे आहे.

Web Title: Four lawyers withdrew, three in the field