वन विभागाने केली ३० लाख वृक्षांची लागवड
By Admin | Updated: September 10, 2014 23:33 IST2014-09-10T23:33:01+5:302014-09-10T23:33:01+5:30
चंद्रपूर वनवृत्त चंद्रपूर कार्यालयाने शासनाने दिलेले वृक्षलागवडीचे लक्षांक पुर्ण केले आहे. चंद्रपूर वनवृत्तांतर्गत येणाऱ्या मध्य चांदा, चंद्रपूर व ब्रह्मपुरी वनविभागात नैसर्गिक व श्रमदानाने ३० लाख

वन विभागाने केली ३० लाख वृक्षांची लागवड
चंद्रपूर : चंद्रपूर वनवृत्त चंद्रपूर कार्यालयाने शासनाने दिलेले वृक्षलागवडीचे लक्षांक पुर्ण केले आहे. चंद्रपूर वनवृत्तांतर्गत येणाऱ्या मध्य चांदा, चंद्रपूर व ब्रह्मपुरी वनविभागात नैसर्गिक व श्रमदानाने ३० लाख वृक्षांची लागवड झाली आहे.
दिवसेंदिवस वाढत असलेली वृक्षतोड त्यामुळे जंगल क्षेत्राचा होणारा ऱ्हास व ढासळत चाललेला पर्यावरणाचा समतोल टिकविण्यासाठी शासनाकडून दरवर्षी वनविभागाला वृक्ष लागवडीचे लक्ष्यांक दिले जाते. यावर्षी चंद्रपूर वनवृत्ताला ३० लाख वृक्ष लागवडीचे लक्ष दिले होते. यात वनवृत्ताच्या तिनही वनविभागाने हे लक्ष पूर्ण केले आहे. मध्य चांदा वन विभागात ३१ मार्च पूर्वी श्रमदानाने १ लाख ९६ हजार वृक्षांची लागवड झाली. तर चंद्रपूर वनविभागात १ लाख ९८ हजार व ब्रह्मपुरी वनविभागात २ लाख ६८ हजार वृक्षांची लागवड झाली आहे. तर नैसर्गीक व कृत्रीम पध्दतीने चंद्रपूर वनविभागाच्या १२५५ हेक्टरवर ९ लाख ७८ हजार, ब्रह्मपुरी वनविभागाच्या १४४० हेक्टरवर ७ लाख ३८ हजार व मध्य चांदा वनविभागाच्या ११६० हेक्टरवर ६ लाख २९ हजार वृक्षांची लागवड झाली आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व जंगल क्षेत्र वाढविण्यासाठी शासनाने वनविभाग तसेच ग्रामपंचायतींना वृक्षलागवडीचे उद्दीष्ठ दिले. यासाठी शासनाने ग्रामपंयातीला निधी दिला. १०० कोटी वृक्षलागवड योजने अंतर्गत अनेक ग्रामपंचायतीनी वृक्ष लागवड करण्यासाठी निधीची उचल केली. मात्र, प्रत्यक्षात वृक्ष लावले नाही. ही बाब शासनाच्या निदर्शनास येताच वृक्षलागवड योजनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांत धास्ती निर्माण झाली आहे.
समितीच्या चौकशीवरुन वृक्ष ग्रामपंचायतीतील लागवडीचा नेमका आकडा समजणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)