कोविशिल्ड पाठोपाठ चंद्रपुरात आता कोव्हॅक्सिन लसही दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 05:00 IST2021-03-14T05:00:00+5:302021-03-14T05:00:42+5:30

कोरोना संसर्ग वाढत असतानाच जिल्ह्यात प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम सुरू आहे. ६० वर्षे तसेच ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त व्यक्तींनाही लस देण्याची परवानगी मिळाल्याने सर्वच केंद्रांवरून प्रतिसाद मिळत आहे. लस घेताना कुणालाही ताटकळत राहण्याची वेळ येऊ नये, याकरिता सर्व उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय व १८ प्राथमिक आरोग्य केंद्रांतही कक्ष सुरू करण्यात आले.

Following Kovishield, Kovacin vaccine was also introduced in Chandrapur | कोविशिल्ड पाठोपाठ चंद्रपुरात आता कोव्हॅक्सिन लसही दाखल

कोविशिल्ड पाठोपाठ चंद्रपुरात आता कोव्हॅक्सिन लसही दाखल

ठळक मुद्दे४९ हजार ८०० कोविशिल्ड तर कोव्हॅक्सिनचे ४ हजार ८०० डोस

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरणाची व्याप्ती वाढविल्याने डोस कमी पडू नये, या हेतूने जिल्हा प्रशासनाने अतिरिक्त लसींची मागणी केली होती. राज्य शासनाने तातडीने मंजुरी दिल्याने शनिवारी (दि. १३) जिल्ह्यासाठी ४९ हजार ८०० डोस मिळाले. विशेष म्हणजे, भारत बॉयोटिक्स व केंद्र शासनाच्या आयसीएमआरने तयार केलेल्या कोव्हॅक्सिनचे ४ हजार ८०० डोस जिल्ह्याला प्रथमच पाठविण्यात आले आहेत.
कोरोना संसर्ग वाढत असतानाच जिल्ह्यात प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम सुरू आहे. ६० वर्षे तसेच ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त व्यक्तींनाही लस देण्याची परवानगी मिळाल्याने सर्वच केंद्रांवरून प्रतिसाद मिळत आहे. 
लस घेताना कुणालाही ताटकळत राहण्याची वेळ येऊ नये, याकरिता सर्व उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय व १८ प्राथमिक आरोग्य केंद्रांतही कक्ष सुरू करण्यात आले. चंद्रपूर महानगर पालिका आरोग्य विभाग अंतर्गत लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेणाºयांची संख्याही केंद्रनिहाय उद्दिष्ट्यपूर्तीच्या दिशेने जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने राज्याच्या आरोग्य विभागाकडे लसींची मागणी नोंदविली होती.
 शुक्रवारी मुंबईतून लसींचे डोस नागपुरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयात प्राप्त झाले होते.
 

कोव्हॅक्सिनचे ४ हजार ८०० डोस जिल्ह्याला पहिल्यांदाच मिळाले आहेत. लस पूर्णत: सुरक्षित आहे. ही लस शक्यतो स्वतंत्र केंद्रात दिल्या जाऊ शकते. पण, यासंदर्भात अद्याप निर्णय झाला नाही. यापूर्वी प्राप्त झालेल्या लसींचे जिल्ह्यातील केंद्रांना वितरण करण्यात आले आहे.
- डॉ. संदीप गेडाम,  जिल्हा लसीकरण अधिकारी, जि. प. चंद्रपूर
 

कोव्हॅक्सिनसाठी स्वतंत्र केंद्र ?
जिल्ह्यात आतापर्यंत कोविशिल्डचे ४० हजार डोस पाठविण्यात आले. ही लस सिरम इन्स्टिट्युटने तयार केली. ही लस टोचल्यानंतर आजपर्यंत कुणाच्या प्रकृतीवर अनिष्ट परिमाण झाला नाही, असा आरोग्य विभागाचा दावा आहे. शनिवार प्रथमच कोव्हॅक्सिनचे ४ हजार ८०० डोस जिल्ह्याला मिळाले. मात्र, ही लस टोचण्यासाठी नवीन स्वतंत्र केंद्र सुरू करणार की जुन्या केंद्राचा पर्याय स्वीकार याबाबत स्पष्टता नाही.
 

 

Web Title: Following Kovishield, Kovacin vaccine was also introduced in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.