स्कूलबसचे नियम काटेकोर पाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 22:37 IST2019-02-15T22:37:25+5:302019-02-15T22:37:48+5:30

स्कूलबसने विद्यार्थ्यांची ने-आण करताना विद्यार्थ्यांना धोका होवू नये, यासंदर्भात जनजागृती करण्याकरिता पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शहरातील शाळांच्या मुख्याध्यापक प्राचार्यांची बैठक घेऊन स्कूलबच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

Follow the rules of school bus | स्कूलबसचे नियम काटेकोर पाळा

स्कूलबसचे नियम काटेकोर पाळा

ठळक मुद्देमहेश्वर रेड्डी : चंद्रपुरात जिल्हा स्कूल बस समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : स्कूलबसने विद्यार्थ्यांची ने-आण करताना विद्यार्थ्यांना धोका होवू नये, यासंदर्भात जनजागृती करण्याकरिता पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शहरातील शाळांच्या मुख्याध्यापक प्राचार्यांची बैठक घेऊन स्कूलबच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
३० जानेवारी रोजी स्थानिक बी.जे.एम. कारमेल अ‍ॅकेडमी येथील विद्यार्थ्याचा शाळेच्या वेळेत अपघात होऊन मृत्यू झाला. अशा दुर्देवी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता पोलीस अधीक्षकांनी या बैठकीचे आयोजन केले होते. प्रत्येक शाळास्तरावर शाळेतील मुलांची सुरक्षितपणे ने-आण करणे, परिवहन शुल्क व बस थांबे निश्चित करणे यासाठी प्रत्येक शाळेची एक परिवहन समिती स्थापन करावी, अशा सुचना सर्व शाळांना सूचना दिल्या. स्थापित समितीकडून वाहनांची कागदपत्रे, नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, परवाना, वायु प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, वाहन चालविण्याचे लायसन्स, अग्निशामक, प्रथमोपचार पेटी आदींची पडताळणी करण्यात यावी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षीत प्रवासाकरिता शाळेचे प्राचार्य किंवा मुख्याध्यापक जबाबदार राहतील अशी सूचनाही पोलीस अधीक्षक यांनी दिली. स्कूलबसमधील प्रथमपोचार पेटी व आवश्यक औषधे बसमध्ये आहेत किंवा नाही, याची प्राचार्यांनी दर महिन्याला तपासणी करण्याबाबतच्या सूचनाही पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी यावेळी दिल्या.
बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वांभर शिंदे, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण उपस्थित होते.

Web Title: Follow the rules of school bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.