३ मे पर्यंत लॉकडाऊनचे पालन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 05:00 AM2020-04-18T05:00:00+5:302020-04-18T05:00:28+5:30

जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रूग्ण नसला तरी याचा अर्थ जिल्हा धोक्याबाहेर आहे असे नाही. त्यामुळे ३ मे पर्यंत जिल्ह्यातील लॉकडाऊन कायम राहणार असून घराबाहेर निघून १४४ कलमाचे उल्लंघन करू नये. शेतकऱ्यांच्या हितासाठी आता कापूस, तूर, धान, खरेदी व विक्रीला परवानगी देण्यात आली. मात्र, नागरिकांनी मास्क लावूनच बाहेर निघावे व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शुक्रवारी केले.

Follow the lockdown until May 3rd | ३ मे पर्यंत लॉकडाऊनचे पालन करा

३ मे पर्यंत लॉकडाऊनचे पालन करा

Next
ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचे आवाहन : कापूस, तूर, धान खरेदी विक्रीला परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रूग्ण नसला तरी याचा अर्थ जिल्हा धोक्याबाहेर आहे असे नाही. त्यामुळे ३ मे पर्यंत जिल्ह्यातील लॉकडाऊन कायम राहणार असून घराबाहेर निघून १४४ कलमाचे उल्लंघन करू नये. शेतकऱ्यांच्या हितासाठी आता कापूस, तूर, धान, खरेदी व विक्रीला परवानगी देण्यात आली. मात्र, नागरिकांनी मास्क लावूनच बाहेर निघावे व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शुक्रवारी केले.
महाराष्ट्रात तसेच लगतच्या दोन जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्ग रूग्णांची संख्या वाढत आहे. अशावेळी आपल्या आजूबाजूच्या घरात नव्याने कोणी आल्यास त्याची तपासणी झालीच पाहिजे. पोलीस प्रशासनाने ५२ ठिकाणी नाकाबंदी केली आहे. याशिवाय राजुरा तालुक्यातील धानोरा, सोनुर्ली, आर्वी, देवाडा, कोलगाव, वरोडा, गोवरी, साखरवाही, खामोना, पाचगाव, इसापूर, सोनापूर, विहीरगाव, नोकारी, अंतरगाव, अन्नूर, चंदनवाही, आक्सापूर, गोजोली, पोडसा, नंदाप्पा, पुनागुडा, येल्लापूर, देवलागुड्डा, आंबेझरी, धनकदेवी गावाच्या आरोग्य रक्षणासाठी आदर्श पद्धतीने काम केले जात आहे. ४३ जणांना अटक आतापर्यंत संचारबंदी उल्लंघनाचे १६४ गुन्हे तर ४३ जणांना अटक झाली असून ६८४ वाहने जप्त करण्यात आली. ही वेळ प्रत्येकांनी एकमेकाला मदत करण्याची असून स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशासनाने मिळून गावांमध्ये नवीन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद ठेवावी व माहिती संबंधित विभागाला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी केले.

दररोज २ हजार ४०० शिवभोजन थाळी
जिल्ह्यात ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही पण अन्नधान्याची आवश्यकता आहे. त्यांनी संबंधित तहसील कार्यालयात संपर्क साधावा. प्रथम आपल्या नावाची नोंद करावी. कोणीही उपाशी राहणार नाही, याबाबत दक्षता घेत आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला. जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये शिवभोजन योजनेला सुरुवात झाली आहे. दररोज २ हजार ४०० शिवभोजन थाळी पुरविली जात आहे. स्वयंसेवी संस्था तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने संकटातील प्रत्येक व्यक्तीला मदत पोहचविण्याचे काम सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
शेतमालाला अडवणूक करू नका
शेतमालाची वाहतूक, पशुखाद्य, पशु औषधी, कीटकनाशके, खते-बियाणे आदींची वाहतूक व विक्रीला केंद्र शासनाच्या निर्देशानंतर कोणतेही निर्बंध ठेवण्यात आले नाही. मात्र, शेतीच्या कामाला सुरूवात करताना सामाजिक दुरी राखणे आवश्यक आहे. संबंधित विभागाने शेतकºयांची कदापि अडणूक करू नये, असे निर्देशही जिल्हाधिकाºयांनी दिले.

२ हजार ६४३ नागरिक निगरानीखाली
शुक्रवारपर्यंत कोरोना संसर्ग संशयित म्हणून ७७ नागरिकांची नोंदणी झाली आहे. ६९ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ६५ नमुने निगेटिव्ह निघाले आहेत. केवळ ४ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या २८ हजार ८६३ आहे. यापैकी २ हजार ६४३ नागरिक निगराणीखाली आहेत. १४ दिवसांच्या होम क्वारंटाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या २६ हजार २२० आहे. जिल्ह्यात ७२ नागरिकांना इन्स्टिट्युशनल क्वारंन्टाईन करण्यात आले, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी दिली.

Web Title: Follow the lockdown until May 3rd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.