बल्लारपूर पंचायत समितीत फ्लोराईडयुक्त पाण्याचा पुरवठा
By Admin | Updated: July 1, 2014 23:25 IST2014-07-01T23:25:45+5:302014-07-01T23:25:45+5:30
बल्लारपूर पंचायत समितीत ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मागील चार महिन्यांपासून कार्यालयातील पाण्याचे फ्रीजर बंद असून सध्या

बल्लारपूर पंचायत समितीत फ्लोराईडयुक्त पाण्याचा पुरवठा
कोठारी : बल्लारपूर पंचायत समितीत ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मागील चार महिन्यांपासून कार्यालयातील पाण्याचे फ्रीजर बंद असून सध्या बोअरवेलच्या फ्लोराईडयुक्त पाण्याचा पुरवठा करुन नागरिकांच्या आरोग्याशी खेळखंडोबा करण्याचे काम सुरू आहे.
ग्रामीण भागातील शेकडो नागरिक पंचायत समितीच्या कार्यालयात विविध कामासाठी दररोज येत असतात. या वर्षी उन्हाळा चागलाच तापला. त्यामुळे नागरिकांसाठी पाण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी फ्रीजरची व्यवस्था करण्यात आली. मात्र फ्रीजर चार महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे तहानलेल्या नागरिकांना थंड पाणी तर सोडा, साध्या पाण्याची व्यवस्था करण्यात पंचायत समिती असमर्थ ठरत आहे. तहानेने व्याकुळ झालेले नागरिक पाण्यासाठी परिसरात भटकत असतात. मात्र पाणी कुठे मिळेनासे झाले. त्यामुळे पंचायत समितीचे अधिकारी व जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पदावर आरुढ झालेले पदाधिकारी या गंभीर बाबीकडे कधी गांभीर्याने पाहात नसल्याने जनतेत तिव्र नाराजी पसरली आहे. दुसरीकडे पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी स्वत:साठी घरुन पाणी आणतात, तर काही कर्मचारी वर्गणीतून पाण्याची व्यवस्था करीत असल्याचा प्रकार दिसून आला.
फ्रीजर बंद असल्याचा प्रकार प्रभारी संवर्ग विकास अधिकारी विजय पेंदाम यांच्या लक्षात आणून देताच त्यांनी जून महिन्यात बोअरवेलच्या पाण्याची व्यवस्था केली. मात्र सदर पाणी फ्लोराईडयुक्त असल्याने ते पिण्यायोग्य नाही. तहानलेले नागरिक ते पाणी पित आहेत. परंतु त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता बळकावली आहे.
विविध कामांसाठी शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च होत असताना येथील पंचायत समितीच्या कार्यालयात पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष करुन आरोेग्यांशी खेळखंडोबा करीत आहे. (वार्ताहर)