Fluoride water in 8 villages will solve the problem immediately | १५ गावांतील फ्लोराईडयुक्त पाणी समस्या तत्काळ दूर करणार

१५ गावांतील फ्लोराईडयुक्त पाणी समस्या तत्काळ दूर करणार

ठळक मुद्देमुनगंटीवार यांच्या तारांकित प्रश्नावर मंत्र्यांची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील ५ तालुक्यांमधील १५ गावात ६० नमुने फ्लोराईडबाधीत पाण्याचे नमुने आढळल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी तात्काळ उपाययोजना सुरू करणार असल्याची ग्वाही राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बुधवारी विधानसभेत दिली. आमदार सुधीर मुनंगटीवार यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न विचारून या समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते.
राजुरा, भद्रावती, कोरपना, ब्रह्मपुरी, नागभिड, चंद्र्रपूर, गोंडपिपरी, पोंभुर्णा, सिंदेवाही, मूल या १० पैकी ५ तालुक्यांमधील १५ गावात ६० नमुने फ्लोराईडबाधीत आढळले. ४५ गावातील ९१३ स्त्रोतांची तपासणी केल्यानंतर १६१ नमुने फ्लोराईडबाधित आढळले. उर्वरित ७५२ स्त्रोतांचे पाणी पिण्यास योग्य आहेत. ५४ पैकी ४५ गावांमध्ये पुरवठा योजनेद्वारे शुध्द पाण्याचा पुरवठा सुरू आहे. उर्वरित ९ गावांपैकी ३ गावांमध्ये १ डिफ्लोरिडेशन युनिट, २ जलशुध्दीकरण सयंत्र बसविले आहे. २ गावांमध्ये जलशुध्दीकरण सयंत्र बसविले. एका गावात हातपंप व विहिरीद्वारे शुध्द पाणीपुरवठा सुरू आहे. ३ गावांमध्ये २ नळयोजना व १ जलशुध्दीकरण सयंत्र बसविण्याचे नियोजन असल्याची माहिती पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सभागृहात दिली.

फसवणूकप्रकरणी संचालकांना अटक
एसजेएसव्ही आणि श्रीराम समर्थ सोसायटी या दोन कंपन्यांनी गुंतवणुकदारांची केलेली आर्थिक फसवणूक या विषयाकडे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तारांकित प्रश्नाद्वारे लक्ष वेधले होते. सदर कंपनीच्या १४ संचालकांविरूद्ध गुन्हा नोंदवून १० आॅक्टोबर २०१९ रोजी तर श्रीराम समर्थ सोसायटी कंपनीच्या संचालकांना २१ डिसेंबर २०१९ रोजी अटक करण्यात आली. दोन्ही गुन्ह्यांचा तपास चंद्रपूर पोलीस विभागातील आर्थिक गुन्हे शाखा करीत असल्याचे उत्तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.

Web Title: Fluoride water in 8 villages will solve the problem immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.