नाल्यांना पूर, शेकडो गावात शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 05:00 AM2021-07-23T05:00:00+5:302021-07-23T05:00:47+5:30

चंद्रपूरसह जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची झळ सुरू आहे.  गुरुवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास वेग धरलेल्या पावसाने दुपारी १.३० वाजपर्यंत अक्षरश: झोडपून काढले. पावसामुळे शहरातील सर्व वस्त्या जलमय झाल्या. रामनगर ते बिनगेट मार्गावरील अनेकांच्या घरात पाणी शिरले. शहरातील मुख्य वस्ती, तुकूम, बाबूपेठ, बंगाली कॅम्प या परिसरातही अशीच स्थिती होती. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरही जलमय झाला.

Floods in nallas, hundreds of villages flooded | नाल्यांना पूर, शेकडो गावात शिरले पाणी

नाल्यांना पूर, शेकडो गावात शिरले पाणी

Next
ठळक मुद्देचंद्रपुरात सिमेंट नाली बांधकामांची पोलखोलवर्दळीचे रस्ते झाले जलमयमुसळधार पावसामुळे अनेक घरांचे नुकसानशेकडो हेक्टर शेती पाण्याखालीपुराच्या पाण्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दोन आठवड्यांपासून दडी मारलेल्या पावसाची बुधवारपासून झळ सुरू झाली. गुरुवारी पावसाने वेग धरून मुसळधार बरसल्याने नदी, नाले फुगले तर अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. ग्रामीण भागातील अनेक रस्ते बंद झाल्याने नागरिक अडकले. वाहतूक ठप्प झाली. पावसाने धुवाधार झोडपल्याने चंद्रपुरातील वर्दळीच्या मार्गावर तर जणू नदी अवतरल्याचे दिसून आले. जनजीवन विस्कळीत झाले. गुरुवार जिल्ह्यात २४ तासात ४४७.७. मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
चंद्रपूरसह जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची झळ सुरू आहे.  गुरुवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास वेग धरलेल्या पावसाने दुपारी १.३० वाजपर्यंत अक्षरश: झोडपून काढले. पावसामुळे शहरातील सर्व वस्त्या जलमय झाल्या. रामनगर ते बिनगेट मार्गावरील अनेकांच्या घरात पाणी शिरले. शहरातील मुख्य वस्ती, तुकूम, बाबूपेठ, बंगाली कॅम्प या परिसरातही अशीच स्थिती होती. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरही जलमय झाला.

लाल नाला प्रकल्पाचे सहा गेट उघडले 
पावसामुळे लाल नाला प्रकल्पाचे सहा गेट उघडण्यात आले. गोसीखुर्द धरणातून १६० क्युमेक्स पाणी सोडले जात आहे. पावसामुळे आज दुपारी २ वाजतापासून जल विसर्गाची पातळी ५०० क्युमेक्सपर्यंत वाढविण्यात आली. नदीकाठावरील गावांनी काळजी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

सर्व तालुक्यांत पावसाची झळ
सोयाबीन व कपाशीच्या पेरण्या आटोपल्या. सध्या पिकांची स्थिती बरी आहे. मात्र, जुलै महिन्यातील दोन आठवडे कोरडे गेल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढली. पऱ्हे रोवणीच्या स्थिती असूनही पाऊस नव्हता.  बुधवारपासून सर्वच तालुक्यात झड सुरू आहे. झडीच्या पावसाचे पाणी जमिनीत चांगले मुरते. त्यामुळे धान उत्पादक तालुक्यात रोवणीला वेग येण्याची शक्यता आहे.

शेतकरी दुचाकीसह वाहून गेला
राजुरा : भेदोडा येथील चंदू बिल्लावार (५५) हा शेतकरी गावाजवळील नाल्यावर आलेल्या पुरात आपल्या दुचाकीसह वाहून गेला. ही घटना गुरुवारी घडली. चंदू हा गावाकडे दुचाकीने जात होता. भेदोडा नाल्याला पूर असतानाही त्याने आपली दुचाकी पाण्यात टाकली आणि पुरात दुचाकीसह वाहून गेला, अशी माहिती प्राप्त झाली आहे. राजुरा पोलीस घटनास्थळी पोहोचले असून शोध घेणे सुरू आहे. या शेतकऱ्याचे कृषी केंद्र आहे.

 

Web Title: Floods in nallas, hundreds of villages flooded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.