मातीच्या ढिगाऱ्यामुळे पुराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:00 IST2020-06-09T05:00:00+5:302020-06-09T05:00:51+5:30

वेकोलि प्रशासनाने महसूल विभाग व पर्यावरण विभागाची कोणतीही परवानगी न घेता नाल्यांमध्ये माती टाकून रस्ता तयार करत आहे. नाल्यांमध्ये माती टाकल्याने नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बंद झाला असून नाल्यामध्ये मोठे मोठे दगड व माती जमा झाली आहे. नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बंद झाल्यामुळे पावसाळ्यात पाणी जमा होऊन पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

Flood risk due to mounds of soil | मातीच्या ढिगाऱ्यामुळे पुराचा धोका

मातीच्या ढिगाऱ्यामुळे पुराचा धोका

ठळक मुद्देसास्ती कोळसा खाण : तहसीलदारांना गावकऱ्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
सास्ती : वेकोलिच्या सास्ती ओपण कास्ट कोळसा खाणीतील निघालेली माती गावाच्या पश्चिमेला असलेल्या महसुली नाल्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात टाकण्यात आली आहे. परिणामी नाल्यातील प्रवाह बंद झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यातील पाण्यामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नाल्यातील माती काढून प्रवाह पूर्ववत करावा, अन्यथा, आंदोलन करण्याचा इशारा उलगुलान संघटनेतर्फे राजुराचे तहसीलदार रविंद्र होळी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
वेकोलि प्रशासनाने महसूल विभाग व पर्यावरण विभागाची कोणतीही परवानगी न घेता नाल्यांमध्ये माती टाकून रस्ता तयार करत आहे. नाल्यांमध्ये माती टाकल्याने नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बंद झाला असून नाल्यामध्ये मोठे मोठे दगड व माती जमा झाली आहे. नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बंद झाल्यामुळे पावसाळ्यात पाणी जमा होऊन पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सास्ती, गोवरी, कडोली बाबापूर, बल्लारपूर, मानोली, कोलगाव अशा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. तसेच नदीकाठच्या शेतीचीही मोठी नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेकोलि मुख्य महाप्रबंधक गुन्हा दाखल करावा, नाल्याचा प्रवाह पूर्ववत करावा अशी मागणी केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे अनिश मानकर, संघपाल देठे, पुरुषोत्तम नळे, साहिल झाडे, प्रशांत वाघमारे आदी उपस्थित होते.

 

Web Title: Flood risk due to mounds of soil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.