लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अवयवदान करण्याविषयी समाजात असलेले अनेक गैरसमज दूर होत आहेत. अवयवदान करणाऱ्यांची संख्या आता वाढू लागल्याचे दिसून येते. त्यामुळे अवयवदानासाठी आवश्यक असलेले अत्याधुनिक ‘नॉन टॉन्सप्लॉन्ट रिट्रीएव्हल सेंटर’ सुरू करण्यासाठी चंद्रपुरातील पाच खासगी रूग्णालय पुढे सरसावले. यासंदर्भात आरोग्य संचालक कार्यालयाकडे अर्ज सादर करण्यात आले आहे.जीवन व मृत्यू हे शाश्वत सत्य असले तरी अकाली मृत्यू हा कुटुंबीयांसह साºयांच्याच काळजाला घरे पाडणारा आहे. मृत्यू शय्येवर असलेल्या अवयव निकामी झालेल्या रूग्णांना योग्य वेळेत अवयवदाते मिळाल्यास अशा रूग्णांचा जीव वाचविण्याचे सामर्थ्य आजच्या आधुनिक वैद्यकशास्त्राने निर्माण केले आहे. परंतु अवयवदानासंबंधी प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी अत्याधुनिक केंद्र आणि यासंदर्भातील सर्व पैलुंचे प्रशिक्षण होणे गरजेचे आहे समाजमनात असलेले गैरसमज व अंधश्रद्धा आदी कारणांमुळे अवयवदान करणाºयांची संख्या अजुनही म्हणावी तशी वाढली नाही.मात्र, मागील दहा वर्षांत जिल्ह्यात आरोग्य विभाग, खासगी रूग्णालये व विविध सामाजिक संस्थांकडून आरोग्य जागृती सुरू असल्याने मानसिकता बदलत असल्याचे दिसून येते.शहरातील मानवटकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ. रोहन आर्इंचवार यांच्या सीएचएल हॉस्पिटल, डॉ. कुबेर हॉस्पिटल, डॉ. अमित मुरके यांचे आस्था हॉस्पिटल व डॉ. बुक्कावार हॉस्पिटलने केंद्रासाठी आरोग्य संचालकांकडे प्रस्ताव सादर केला. पडताळणी नंतरच या केंद्राला मान्यता मिळण्याची शक्यता आहे.वैद्यकीय महाविद्यालयातच सेवा उपलब्धमोहन फाऊंडेशन ही संस्था अवयदान क्षेत्रात कार्यरत करते. केंद्र सरकार व संस्था यांच्यात करार झाला. त्यानुसार चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नॉन टॉन्सप्लॉन्ट रिट्रीएव्हल सेंटर सुरू करण्यात आले आहे. ब्रेन डेड रूग्णांचे अवयव या सेंटरच्या माध्यमातून काढले जातात. यासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तज्ज्ञ डॉक्टरांची समिती गठित करण्यात आली. जिल्ह्यात सध्या एकाही खासगी रूग्णालयाला नॉन टॉन्सप्लॉन्ट रिट्रीएव्हल सेंटर म्हणून मान्यता देण्यात आली नाही.पाच खासगी डॉक्टरांनी यासाठी रितसर प्रस्ताव पाठविला आहे. अद्याप त्यांना मंजुरी मिळाली नाही. काही प्रस्ताव वर्षभरापासून प्रलंबित आहे. केंद्र परवानगी देताना सर्व प्रकार सुविधांची पाहणी व पडताळणी केली जाते.-डॉ. एस. एस. मोरे, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर
अवयवदान केंद्रासाठी सरसावले पाच खासगी रूग्णालये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:28 IST
अवयवदान करण्याविषयी समाजात असलेले अनेक गैरसमज दूर होत आहेत. अवयवदान करणाऱ्यांची संख्या आता वाढू लागल्याचे दिसून येते. त्यामुळे अवयवदानासाठी आवश्यक असलेले अत्याधुनिक ‘नॉन टॉन्सप्लॉन्ट रिट्रीएव्हल सेंटर’ सुरू करण्यासाठी चंद्रपुरातील पाच खासगी रूग्णालय पुढे सरसावले.
अवयवदान केंद्रासाठी सरसावले पाच खासगी रूग्णालये
ठळक मुद्देआरोग्य संचालकांकडे प्रस्ताव सादर : पडताळणीनंतरच परवानगी