शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

पाच दिवसांच्या पावसाची जिल्ह्याला झड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:42 AM

चंद्रपूर जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील वर्धा नदीसह अन्य लहान नद्या व नाल्यांना आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका शेतपिकाला बसला आहे. यासोबतच सावली तालुक्यात एक जिवितहानी, ब्रह्मपुरी तालुक्यात एक जनावर दगावले.

ठळक मुद्देसर्वाधिक ८ हजार १५१ हेक्टरातील कपाशीचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील वर्धा नदीसह अन्य लहान नद्या व नाल्यांना आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका शेतपिकाला बसला आहे. यासोबतच सावली तालुक्यात एक जिवितहानी, ब्रह्मपुरी तालुक्यात एक जनावर दगावले. तसेच ३१९ घरांची पडझड झाली, तर १४ गोठे बाधित झाल्याचा शासकीय अंदाज आहे.दि. १५ आॅगस्टपासून जिल्ह्यात पावसाचे दमदार पुनरागमन झाले. तेव्हापासून पावसाने पिच्छा सोडलेला नाही. कधी रिमझिम, तर कधी मुसळधार अशी संततधार सुरू आहे. यामुळे वर्धा पैनगंगा नदीपरिसरातील नाल्यांना आलेल्या पुराचा फटका बल्लारपूर, राजुरा, कोरपना, गोंडपिपरी या तालुक्यांना बसला आहे. या पाच तालुक्यातील ११ हजार ७४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. यातही सर्वाधिक फटका बल्लारपूर तालुक्याला बसला आहे. बल्लारपूर तालुक्यातील ४ हजार ७१० हेक्टरातील पिकांचे नुकसान झाल्याची शासकीय माहिती आहे.जिल्ह्यात ११ हजार ७४ हेक्टर पीक क्षेत्र बाधित झाले. यामध्ये सर्वाधिक ८ हजार १५३ हेक्टरातील कपाशीच्या पिकाचे नुकसान झाले आहेत, तर १ हजार ३१२ हेक्टरातील सोयाबीन, ८३० हेक्टरातील धानपिक व ७७९ हेक्टरातील तुर पिकाचे नुकसान झाले आहे. यामध्ये २ हजार ३३५ हेक्टरात ३३ टक्केपेक्षा कमी नुकसान झाले असून ८ हजार ७३९ हेक्टरात ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे. राजुरा, कोरपना व गोंडपिपरी तालुक्याला पूर व बॅक वॉटरचा फटका बसला. राजुरा तालुक्यात २ हजार ७७ हेक्टर, कोरपना ३ हजार १६० हेक्टर व गोंडपिपरी तालुक्यात १ हजार १२७ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे मुख्य रस्त्यांची चाळणी झाली आहे.इरईच्या जलसाठ्यात समाधानकारक वाढपावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प समाधानकारक भरले आहे. चंदई, चारगाव, अमलनाला, लभानसराड, पगड्डीगुड्डम, डोंगरगाव व आसोलामेंढा हे सात प्रकल्प १०० टक्के भरले आहेत, तर इरई प्रकल्पात समाधानकारक म्हणजेच ६७.३६, लालनाला ९५.७७, घोडाझरी ५३.४९ व नलेश्वर प्रकल्प ८७.८६ टक्के भरला आहे.पांढरकवड्यात पिके कुजलीपांढरकवडा: वर्धा- पैनगंगा नदीच्या पूरामुळे पांढरकवडा परिसरातील सोयाबीन कापूस, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पुराचा गाळ शेतात वाहून आल्याने पिके कुजली आहे. नदीकाठावरील शेतीला सर्वात मोठा फटका बसला. शेतकरी हैराण झाले आहे. कृषी विभागाकडून पाहणी सुरु करण्यात आली. अहवाल तयार करुन पाठविणार, अशी माहिती तलाठ्याने दिली आहे.पुरामुळे जनजीवन विस्कळीतचिमूर : मुसळधार पावसाने तालुक्यातील शेकडो एकर शेतीला फटका बसला. पुरामुळे मंगळवारी सकाळी खडसंगी-मुरपार, भान्सुली, पिंपळगाव, डोमा, खापरी , कान्हाळगाव म्हसली, मासळ तुकुम व केसलाबोडी गावांचे मार्ग काही तास बंद होते. नागरिक व विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. मुसळधार पाऊस व वादळाने काही गावांतील मातीच्या घरांची पडझड झाली आहे. चिमूर ते कांपा राष्ट्रीय महामार्गावरील जांभूळघाट शासकीय आश्रम शाळेजवळ मोठे झाड कोसळले. पुराचे पाणी वाढल्याने चिमूर-मासळ , पळसगाव-सिंदेवाही मार्ग दुपारपर्यंत बंद होते. 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर